Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेक जण आवडीने डान्स करताना दिसतात. तुम्ही डान्सचे अनेक प्रकार वाचले किंवा पाहिले असेल पण तुम्ही कधी कोंबडा डान्स पाहिला आहे का? तुम्हाला वाटेल, हा कोणता डान्स प्रकार आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती कोबंडा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कोंबडा डान्स हे नाव तुम्ही पहिल्यांदाचे ऐकले असेल. कोंबडा डान्स नेमका कसा असतो, यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ नीट पाहावा लागेल.

हा व्हायरल व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा डिस्को डान्स करताना दिसत आहे. डिजेच्या तालावर ते अनोखा डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हाला हा डिस्को डान्स नाही तर कोंबडा डान्स वाटेल.काही लोकांना हा अनोखा डान्स पाहून हसू आवरणार नाही. आजोबांनी धोतर अन् कुर्ती घातली आहे. धोतर कुर्तीमध्ये आजोबा तुफान नाचताना दिसत आहे. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. व्हिडीओतील लोकं या आजोबांच्या डान्सचा आनंद लुटताना दिसत आहे. वयाच्या तुलनेत त्यांची दुप्पट ऊर्जा पाहून तुम्हीही भारावून जाल. विशेष म्हणजे डान्स करताना आजोबा स्वत: नाचण्याचा आनंद घेताना दिसत आहे.

हेही वाचा : VIDEO : आजीसमोर तरुणीही फेल! केला भन्नाट खानदेशी डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

vikas_kumar107 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोंबडा डान्स” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी आजोबांचा हा डान्स आवडला आहे. एका युजरने लिहिलेय, “खूप छान डान्स केला” तर एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम डान्स” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात खरी ऊर्जा” या व्हिडीओवर काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader