Viral Video : सोशल मीडियावर अनेक गमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये एक अँकर एका आजोबांबरोबर संवाद साधताना दिसतो आणि त्यांना त्यांच्या पत्नीविषयी प्रेम व्यक्त करण्यास सांगतो. त्यावर आजोबा कसे प्रतिक्रिया देतात, हे तुम्हाला या व्हिडीओत दिसून येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (an old man proposed his wife and said we are already in love watch funny cute video)
हा व्हायरल व्हिडीओ एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला स्टेजवर गर्भवती महिला दिसेल तिच्या शेजारी तिचा पती सुद्धा बसलेला दिसेल आणि स्टेजच्या खाली काही नातेवाईक दिसेल. या नातेवाईकांमध्ये एका आजोबाबरोबर अँकर मजेशीर संवाद साधताना दिसतो.
अँकर – यांच लग्न कोणी जमवलं? (स्टेजकडे बघून)
आजोबा – त्यांचं प्रेम होतं. खरंच प्रेम होतं
अँकर – ते जे प्रेम होतं ना ते त्यांनी बोलून दाखवलं. तसंच तुम्ही एकमेकांना बोलून दाखवायचं आहे. तुमचं लग्न कसं जमलं?
आजोबा – आता आमचं कसं, आमच्या आजोबांनी जमवलं.
अँकर – मुलगी पाहिली होती तेव्हा..
आजोबा – नाही मी नव्हती पाहिली. आजोबांनीच करून दिलं. आजोबांनी सांगितलं हे पोरगी पसंत आहे माझ्या नातवाला म्हणून आम्ही लग्न करून टाकलं
हेही वाचा : गृहिणींनो तुम्हीही विकतची आलं-लसूण पेस्ट वापरता? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
त्यानंतर अँकर काकूबरोबर संवाद साधतात
अँकर – तुम्ही कधी पाहिलं होत त्यांना
आजी – नाही
अँकर – बघायला आले होते तुम्हाला
आजी – नाही
अँकर – डायरेक्ट लग्न जमलं
आजी – हो
अँकर – अरे वा हे जबरदस्त होतं. आमच्या वेळेस बरं झालं ही प्रथा नव्हती. समोर या.. आजोबा काहीतरी बोलणार आहे
त्यानंतर अँकर आजोबांबरोबर पुन्हा संवाद साधतो
अँकर – हातात माइक घ्यायचा आणि माइकमध्ये म्हणायचं मराठीत बोलले तरी चालेल. माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. नाहीतर इंग्रजीमध्ये आयलव्हयू म्हटलं तरी चालेल
आजोबा – आमचं आयलव्हयू आहेच आहे आणि अजुनही आहेच
अँकर – फक्त ते माइकमध्ये बोलायचं
आजोबा – हा ठीक आहे, बोलतो.
आजोबा – आमचं आय लव्ह यू आहेच आहे पहिल्यापासून.. आय लव्ह यू..
त्यानंतर आजोबा दोन्ही हात वर करून हसतात आणि आनंद व्यक्त करतात. व्हिडीओत ते आणि इतर नातेवाईक जोर जोराने हसताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
its_shubz_photography या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “साधी माणसं व त्यांचे साधे विचार,आपली शेवटची पिढी आहे जे हे सगळं आपल्याला अनुभवयाला मिळालं”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजोबांनी लग्न जमवलं, त्यांनी थोरा मोठ्यांचा शब्द प्रमाण मानून लग्न केलं, संसार केला. आजही किती खुश आणि प्रेम आहे एकमेकांवर. धन्य ती जुनी पिढी आणि संस्कार नाही तर आज 2 महिन्यात कोर्ट कचेऱ्या चालू होतात अशी उदाहरणं आहेत.” तर एका युजरने लिहिलेय, “अशी पिढी आता पुन्हा होणे नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप निरागस जोडपं आहे” एक युजर लिहितो, “खूप छान. व्हिडीओ पाहून चेहऱ्यावर स्माइल आली” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.