Viral Video : आई वडील हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. आईविषयी बऱ्याचदा लिहिले जाते किंवा बोलले जाते. वडिलांविषयी फारसं लिहिलं जात नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे स्थान सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती वडिलांचे महत्त्व सांगताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

आई वडील दोघांचेही त्यांच्या मुलांवर खूप प्रेम असते पण अनेकदा वडील व्यक्त होत नाही. त्यामुळे आपण अनेकदा वडिलांना गृहित धरतो पण वडिल आपल्यावरील त्यांचे प्रेम कधीही व्यक्त होत नाही. न बोलता ते आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. पण वडिलांची सावली खूप महत्त्वाची आहे. या व्हायरल व्हिडीओत सुद्धा आजोबांनी वडिलांची सावली असणे फार महत्त्वाचं आहे, असे सांगितले आहे.

Dance kaka ajoba
लग्नात काका अन् आजोबांनी केला झिंगाट डान्स! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “प्रत्येक लग्नात एक तरी नातेवाईक….”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Video of uncle standing in fountains on FC Road goes viral
पुणेकर उन्हाळ्यासाठी सज्ज! कारंज्यांवर उभ्या असलेल्या काकांचा Video Viral, नक्की काय आहे प्रकरण?
Girl's celebrated father's birthday in a unique way
‘प्रत्येकाच्या पदरी एक तरी लेक असावी…’, चिमुकल्यांनी बाबांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने केला साजरा; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही भाग्यवान वडील”
Old man plays drums at wedding emotional video viral on social Media
VIDEO: “गरिबी आणि जबाबदारी वय बघत नसते” या वयात आजोबांचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
an old man in 90s do exercise
VIDEO : नव्वदीतही आजोबा करताहेत व्यायाम! तरुणांनो, मग तुम्ही का कारणं देता? Video Viral
grandpa providing copy to Grandchild During Exam Goes Viral
VIDEO : परीक्षा सुरू असताना नातवाला कॉपी पुरवत होते आजोबा, व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती वडिलांविषयी सांगतो, “बापाची सावली फार महत्त्वाची आहे लक्षात ठेवा.बापाचा आधार फार मोठा आहे पैसा मोठा नाही, इस्टेट मोठी नाहीये. सावली फार मोठी आहे. पैशापेक्षा सावली फार मोठी आणि महत्त्वाची आहे. अन् बाप हा पाहिजे सावलीला. कसं असतं तुमच्या डोक्यावर जरी हात फिरवला ना तरी तुमचं अर्धे टेन्शन कमी होतं. ते फार जबरदस्त असतं…”

हेही वाचा : VIDEO : कोणी छतावर, तर कोणी खिडकीवर चढून पुरवतोय ‘कॉपी’; १० वीच्या परीक्षेदरम्यानचा धक्कादायक प्रकार

marathi.chhava या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शमध्ये लिहिलेय, “बापाची सावली असणं फार महत्त्वाचंय.!”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप खोल संदेश दिला. फक्त हे तेच लोकं समजू शकतील ज्यांना वडील नाही” तर एका युजरने लिहिलेय, “अगदी खरंय, बाप मागे उभा असला तरी समोरची अडचण लगेच छोटी होते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “बरोबर आहे बाप नसल्यावर बापाची किंमत कळते.” अनेक युजर्सना त्यांच्या वडिलांची आठवण आली. एका युजरने लिहिलेय, “खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही, माझ्या बापापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही” तर एका युजरने लिहिलेय, “आय आयुष्यात खूप काही आहे पण बापाचं प्रेम नाही.. बाबा मला तुमची खूप जास्त आठवण येते” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader