सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांचे अनेक व्हिडीओ नेहमी चर्चेत येतात. कधी मजेशीर व्हिडीओ असतात तर कधी आश्चर्यचकीत करणारे व्हिडीओ असतात. काही व्हिडीओ जीवनाचे सार सांगून जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा जीवन जगण्याचा कानमंत्र देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओ पाहून काही लोकं आजोबांचे चाहते होईल.
आयुष्य कसं जगावं, हे अनेकांना वेळ गेल्यानंतर कळते. आयुष्याचं कटू सत्य आजोबांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. भरभरुन जगण्याचा आणि इतरांबरोबर प्रेमाने वागण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी दिलाय. आजोबांचा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक आजोबा दिसताहेत. त्यांनी मराठी पेहराव घातला आहे. डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी, पांढरा कुर्ता घातला आहे. त्यांच्या पेहरावावरुन ते वारकरी असल्याचे दिसताहेत.व्हिडीओ तुम्हाला दिसेल की एक आजोबा काही लोकांना जगण्याचा कानमंत्र देताना दिसताहेत. ते सांगतात, “आयुष्याच्या चित्रपटाला Once More नाही. हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही. नको नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला डिलीट ही करता येत नाही. कारम हा रोजचा तोच जो असणारा रियालिटी शो नाही. म्हणून भरभरून जीवन जगा. सगळ्यांशी प्रेमाने वागा. कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही.” शेवटी आजोबा हसतमुखाने शेजारी उभा असलेल्या एका तरुणाच्या पाठीवरुन हात फिरवतात. आजोबा इतक्या सुंदरपणे आयुष्याची व्याख्या सांगतात की कुणालाही हे पुन्हा पु्न्हा ऐकावे, असे वाटू शकते.

हेही वाचा : Pune : पुण्याजवळ वीकेंडला फिरण्यासाठी ५ बेस्ट ठिकाणे कोणती? पाहा व्हायरल व्हिडीओ

marathi.chhava या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आयुष्याच्या चित्रपटाला Once More नाही” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कोणाला समजत नाही हे लवकर. वेळ गेल्यानंतर समजते.” तर एका युजरने लिहिलेय, “काळजाला भिडणारे शब्द आहेत. अप्रतिम आजोबा” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजोबांनी ३० सेकंदाच्या व्हिडीओमध्ये पूर्ण आयुष्य जगायला शिकवलं” अनेकांना हा व्हिडीओ आवडला आणि आजोबांची सांगण्याची पद्धत सुद्धा आवडली. काही लोकांनी व्हिडीओ पाहून हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An old man told reality of life video goes viral life mantra where life is a movie and it does not have any once more ndj