Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्स करतानाचे तर कधी गाणी म्हणतानाचे व्हिडीओ चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क ६० वर्षाची आजी कॅटवॉक करताना दिसत आहे. आजीचा कॅटवॉक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एखाद्या मॉडेलला लाजवेल असा कॅटवॉक आजी करताना दिसत आहे. सध्या या आजीची जोरदार चर्चा सुरू आहे.
असं म्हणतात, आयुष्याचा प्रत्येक क्षण जगताना वय कधीच आडवे येत नाही. भरभरून प्रत्येक क्षण जगावा. आजीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आजीचे कौतुक करावेसे वाटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ धर्मवीर संभाजी प्रतिष्ठाण अंतर्गत आयोजित कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओत तुम्हाला स्टेजवर एक वयोवृद्ध आजी दिसताहेत. लाल साडी, कपाळावर टिळा आणि डोक्यावर पदर घेऊन या आजीने हौशीने शांताबाई गाण्यावर डान्स करताना दिसतात. त्यानंतर पुढे जबरदस्त कॅटवॉक करताना सुद्धा दिसतात. आजीचा कॅटवॉक पाहून तु्म्हीही आजीचे चाहते व्हाल. आजीचे हावभाव आणि हसऱ्या चेहरा पाहून तुम्हीही आजीच्या प्रेमात पडाल. ७० वर्षाच्या या आजीची एनर्जी एखाद्या मॉडेलला सुद्धा लाजवेल, अशी आहे. आजीचा डान्स आणि कॅटवाॉकवर तिथे बसलेल्या महिला टाळ्या वाजवत आजीला प्रोत्साहन देताना दिसत आहे.

हेही वाचा : Ayodhya Ram Mandir : मुस्लिम महिला अयोध्येतून काशीला घेऊन येईल रामज्योती, सजेल लख्ख दिव्यांची आरास

क्रांतीनाना मळेगावकर यांनी त्यांच्या newhomeminister02 या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “७० वर्षाच्या शांताबाईचा जबरदस्त कॅटवॉक… होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा” क्रांतीनाना मळेगावकर हे न्यू होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) कार्यक्रम गावोगावी आणि शहरोशहरी आयोजित करतात. त्यांच्याच एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही आपल्या महाराष्ट्राची संसकृती. आजी ने मनमुराद आनंद लुटला नाचण्याचा..पण डोक्यावरचा पदर मात्र पडू दिला नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “आमच्या हडपसर गावची आजीबाई शान आणि रुबाब..” अनेक युजर्सनी आजींवर कौतुकाचा वर्षाव केला आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An old woman doing catwalk and amazing dance she live every moment of her life video goes viral ndj
Show comments