एका उबर चालकाने प्रवासाचा मेन्यू कार्ड तयार केला आहे. प्रवाशाला ज्या पद्धतीने प्रवास करायचा तसा यामध्ये मिळणार आहे. George Ure असे त्या चालकाचे नाव असून तो अमेरिकामध्ये राहतो. जॉर्जने आपल्या टॅक्सीमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी तयार केलेले मेन्यू कार्ड व्हायरल होत आहे. लूई नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर हा उबर राइड्सचा मेन्यू कार्ड पोस्ट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे प्रवासाचा मेन्यू –
मेन्यूमध्ये पहिला पर्याय ‘The Stand Up’ आहे. यामध्ये जॉर्ज प्रवाशांसोबत बातचीत करणार. प्रवाशांना विनोद सांगून मनोरंजन करतो. दुसरा पर्याय The Silence Ride असा आहे. यामध्ये चालक पूर्णपणे शांत राहणार. तिसऱ्या पर्यायामध्ये The Therapy Ride आहे. यामध्ये प्रवासी बोलणार आणि चालक फक्त ऐकणार. यामध्ये प्रवासी आपले प्रॉब्लेम किंवा इतर काहीही चालकासोबत शेअर करू शकतो. The Rude Ride मध्ये चालक प्रवाशासोबत प्रत्येकक्षणाला Rude व्यवहार करणार.