Viral Video : सध्या पावसाळा सुरू झाला आहे. सगळीकडे निसर्गरम्य वातावरण आहे. काही लोकांना पावसाळा आवडत नाही तर काही लोकांना पावसाळा खूप आवडतो. पावसात भिजायला त्यांना खूप आवडते. सध्या सोशल मीडियावर भर पावसात भिजत पावसाचा आनंद लुटणाऱ्या अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत अशातच एका काकांचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हे काका पावसाचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे. भर पावसात डान्स करताना दिसत आहे. काकांना असे डान्स करताना पाहून तुम्हाला तुमचे बालपणीचे दिवस आठवतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (an uncle dances in rain so gracefully on chak dhoom dhoom song)
हा व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की पाऊस सुरू आहे . काही लोक पावसामुळे दुकानाच्या छत्राखाली थांबलेले आहे पण एक काका मात्र या भर पावसात डान्स करताना दिसत आहे. काकांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. काकांनी जीन्स, टी शर्ट आणि डोक्यावर कॅप घातली आहे. काकांचा डान्स आणि लूक पाहून तुम्ही त्यांच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. ते ‘चाक धूम धूम, चाक धूम धूम ‘ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि ऊर्जा पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या ऊर्जेसमोर तरुण सुद्धा फिके पडतील. इतर लोक आवडीने काकांचा डान्स पाहताना दिसत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : “बुम्बरो बुम्बरो श्याम रंग बुम्बरो” शिक्षिकेने शिकवला चिमुकल्यांना सुंदर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
mr_mehboob_shah_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खूप छान आहे काका.
चैतन्यशील आहात तुम्ही” या व्हिडीओवर लाखो लाइक्स आल्या असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. युजर्सनी काकांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “मजा घेण्याचे कोणतेही वय नसते” तर एका युजरने लिहिलेय, “वय कितीही असो, मन तरुण असायला पाहिजे” आणखी एका युजरने लिहिलेय, “येथे वयाच्या २५ व्या वर्षी आमचा श्वास भरून येतो” अनेक युजर्सनी काकांचा डान्स पाहून भन्नाट इमोजी शेअर केले आहेत.