Anaconda Crocodile Fight Viral Video : वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ते शिकारीचे असतात तर कधी एखाद्या गमतीदार प्रसंगाचे. पण, काही वेळा प्राण्यांचे असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून खूप भीती वाटते. यात आता एका महाकाय अॅनाकोंडाचा मगरीवरील हल्ल्याचा अतिशय भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. यात अॅनाकोंडा मगरीवर जोरदार हल्ला करताना दिसतेय. या हल्ल्यात अॅनाकोंडा मगरीची अवस्था अशी काही करून ठेवतो की पाहून तुम्हालाही घाम फुटेल.
व्हिडीओमध्ये अॅनाकोंडा मगरीवर वर्चस्व राखण्यासाठी हल्ला करत असल्याचे दिसत आहे. या लढाईत अॅनाकोंडा मगरीवर इतक्या ताकदीने हल्ला करतो की, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महाकाय अॅनाकोंडा आणि एक मगर पाणवठ्यावर एकमेकांशी झुंजताना दिसत आहेत. यात अॅनाकोंडा सापाने मगरीच्या पूर्ण शरीराला विळखा घातलाय. अॅनाकोंडा त्याच्या महाकाय आणि शक्तिशाली शरीराने मगरीचा गळा दाबताना दिसतोय. यावेळी मगर अॅनाकोंडाला जबड्याने इजा पोहोचवण्याचा खूप प्रयत्न करते, मात्र अॅनाकोंडाने इतका घट्ट विळखा घातला आहे की, मगरीला प्रयत्न करूनही शेपटीशिवाय इतर कोणत्याही अवयवाची हालचाल करणं शक्य होत नाही, हे दृश्य इतकं भयानक आहे की ते पाहणाऱ्यांनीही श्वास रोखून धरले.
अॅनाकोंडाने मगरीला निर्दयीपणे मारले
मगरीने अॅनाकोंडाच्या विळख्यातून सुटण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण तो इतका महाकाय होता की, कोणताही प्राणी त्याच्या विळख्यातून सहज सुटू शकला नसता, त्यामुळे मगरीच्याही बाबतीत तेच झाले. अॅनाकोंडाने मगरीला एवढ्या वेदनादायीपणे मारले की, पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.
अॅनाकोंडा हा जगातील सर्वात मोठ्या सापांपैकी एक आहे, जो त्याच्या भक्ष्याला विळख्यात गुदमरुन मारण्यासाठी ओळखला जातो. त्याचे स्नायू इतके मजबूत असतात की तो कोणताही मोठा प्राणी सहज गिळू शकतो. तर दुसरीकडे, मगर हा एक धोकादायक जलचर शिकारी मानला जातो. ज्याच्या जबड्याच्या ताकदीने तो कोणत्याही भक्ष्याचे सहज दोन तुकडे करू शकतो. व्हिडीओमध्ये या दोन्ही प्राण्यांची ताकद दिसून येत आहे, जे यापूर्वी क्वचितच कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. अॅनाकोंडाने मगरीला विळख्यात गुंडाळून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, तर मगरीने दातांनी सापाला चावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण यावेळी अॅनाकोंडा सापालाच यश मिळाले.
सोशल मीडियावर हा भयानक व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सही त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काहींनी म्हटले की, “हा निसर्गाचा खेळ आहे”, तर काहींनी हे दृश्य फार “भयानक आणि धक्कादायक” असल्याचे म्हटले आहे. एका युजरने लिहिले की, “निसर्ग किती क्रूर असू शकतो हे दृश्य पाहून समजले.” तर दुसऱ्याने लिहिले की, “अॅनाकोंडा आणि मगरीमधील ही लढाई हॉलीवूड चित्रपटापेक्षा कमी वाटत नाही.”