ॲनाकोंडा चित्रपट तुम्ही कधीतरी पाहिला असेलच. त्यातील भलामोठा ॲनाकोंडा आणि थरकाप उडवून देणाऱ्या त्याच्या हालचाली पाहून अक्षरशः प्रत्येकाचाच थरकाप उडतो. केवळ स्क्रिनवर असा राक्षसी ॲनाकोंडा जर आपली अशी अवस्था होत असेल तर मग विचार करा जर असाच राक्षसी ॲनाकोंडा प्रत्यक्षात तुमच्या समोर आला तर… अगदी छोटे मोठे साप जरी दिसले तरी आपली बोबडी वळते, मग चित्रपटात दाखवलाय अगदी तसाच भलामोठा ॲनाकोंडा तुमच्या बाजुने सरपटत आला तर काय होईल? होय, अगदी असाच भलामोठा ॲनाकोंडाने बोटीवर बसलेल्या एका व्यक्तीवर हल्ला केला. हल्ला करण्याआधी हा ॲनाकोंडा पाण्यात लपून बसला होता. हा व्हायरल व्हिडीओ पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती नदीकाठी बोटीवर बसून पर्यटकांच्या एका गटासोबत बसलेला दिसून येत आहे. हा व्हिडीओ मध्य ब्राझीलच्या गोयास राज्यातील अरागुआया इथला आहे. इथल्या नदीवर ब्राझिलियन मासेमारी मार्गदर्शक जोआओ सेवेरिनो हा ३८ वर्षीय व्यक्ती बोटीवर बसला होता. ३० जून रोजी ही घटना घडली आहे.

Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem
Video : ठरलं! मृणाल दुसानिसची नवीन मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये झळकणार ‘हे’ दमदार कलाकार
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
a daughter angry on his father for Spreading things in the house
“नुसता पसारा करतात…” चिमुकलीने काढली वडीलांची खरडपट्टी, Video होतोय व्हायरल
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

आणखी वाचा : OMG! कित्येक फूट उंचावर क्रेनला लटकत राहिला कामगार आणि…, पाहा VIRAL VIDEO

२० सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये ॲनाकोंडा पाण्याखाली बसून गुंडाळी बनवताना दिसत आहे. सेवेरिनो याने आपला मोबाईल कॅमेरा ॲनाकोंडावर फोकस करत असतानाच हा पाण्याखाली लपलेला ॲनाकोंडा पाण्याबाहेर उडी घेतो आणि त्याच्या हल्ला करतो. हे पाहून सारेच जण घाबरून जातात. यात सेवेरिनो याचा जीव थोडक्यात वाचला. हल्ला करून हा ॲनाकोंडा पुन्हा पाण्यात लपलेला दिसून येतो. सेवेरिनो याच्यावर ॲनाकोंडाने केलेल्या हल्ल्यानंतर सारेच जण घाबरून हसताना दिसत आहे.

आणखी वाचा : Hermes Of Ice Cream: आगीत सुद्धा ही आईस्क्रीम विरघळत नाही, किंमत ऐकून हैराण व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : म्हशीने आपल्या हटके स्टाईलने कासवाची केली मदत, पाहा VIRAL VIDEO

न्यू यॉर्क पोस्टने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ॲनाकोंडाचा दंश सेवेरिनोच्या त्वचेत शिरला नाही. ३० फूट लांब आणि ५५० पौंडांपर्यंत वाढू शकणारा हा हिरवा ॲनाकोंडा म्हणून ओळखला गेला. दक्षिण अमेरिकेतील हिरवा ॲनाकोंडा हा जगातील सर्वात मोठा साप आहे. नॅशनल जिओग्राफिकच्या मते, मादी नरपेक्षा खूप मोठ्या असतात.

आणखी वाचा : हिंदू-मुस्लिम हे तर रक्ताचं नातं! VIRAL VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल…

ॲनाकोंडा सहसा दलदलीत आणि संथ गतीने चालणाऱ्या प्रवाहांमध्ये राहतात, मुख्यतः ॲमेझॉन बेसिनच्या उष्णकटिबंधीय पावसाच्या जंगलात. ते जमिनीवर जड असतात, परंतु पाण्यात हलके आणि गुळगुळीत असतात. ॲनाकोंडा हे रानडुक्कर, हरीण, पक्षी, कासव आणि अगदी जग्वार यांची शिकार करतात. विना-विषारी संकुचित करणारे त्यांचे मांस शरीर शिकारभोवती गुंडाळतात आणि प्राणी मरेपर्यंत त्यांचे शरीर पिळतात.