Elon Musk Wearing Sherwani In Ambani Pre Wedding: रिलायन्स चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गजबजले आहेत. जामनगरमधील कार्यक्रमाला रिहानापासून ते बिल गेट्स, मार्क झुकरबर्गपर्यंत अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित होते. या भव्य दिव्य सोहळ्यातील काही फोटो शेअर केले जात आहेत ज्यांनी आमचे लक्ष वेधून घेतले. एक्स, स्पेसएक्स आणि टेस्ला मोटर्सचे सीईओ इलॉन मस्क यांच्या शेरवानी परिधान केलेले फोटो अंबानीच्या पार्टीत असल्याचे सांगत शेअर केले जात आहे.

काय होत आहे व्हायरल?

X युजर @AliSuMiOfficial ने चित्र आपल्या प्रोफाइल वर शेअर केले.

Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Vinod Kambli struggles to walk but touches Sunil Gavaskar feet at Wankhede Stadium ceremony video viral
Wankhede Stadium : विनोद कांबळीने जिंकली सर्वांची मनं! सुनील गावस्कर दिसताच केलं असं काही की…VIDEO होतोय व्हायरल
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”

इतर वापरकर्ते देखील त्याच दाव्यासह फोटो शेअर करत आहेत.

तपास:

अनेक मीडिया रिपोर्ट्सद्वारे आम्हाला कळले की एलॉन मस्क गुजरातमधील जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग पार्टीत सहभागी झाले नव्हते.

https://www.sportskeeda.com/pop-culture/news-only-elon-musk-missing-netizens-react-mark-zuckerberg-arriving-jamnagar-gujarat-anant-ambani-radhika-merchant-s-pre-wedding

प्रसारित होत असलेल्या फोटोंचे आम्ही निरीक्षण केले. या प्रतिमा अतिशय स्मूथ दिसत होत्या आणि बॅकग्राउंड देखील अस्पष्ट होते, हे सूचित करते की फोटो AI निर्मित आहेत. आम्हाला रिव्हर्स इमेज सर्च द्वारे आढळले की पहिले चित्र X वापरकर्त्याने DogeDesigner द्वारे त्याच्या प्रोफाइलवर शेअर केले होते आणि X वापरकर्त्याने @PrinceAnand007 याने या पोस्टला उत्तर म्हणून दुसरा फोटो पोडत केला होता.

https://x.com/PrinceAnand007/status/1763606095476748561

AI इमेज डिटेक्टर Hive Moderation ने सुद्धा सदर फोटो हे एआयनिर्मित असल्याची पुष्टी केली आहे.

हे ही वाचा<< Video: रस्त्यावर नमाज पढणाऱ्यांना लाथ मारून हाकललं; पोलीस अधिकारी निलंबित, नागरिकांचं म्हणणं काय?

निष्कर्ष: X चे CEO इलॉन मस्क यांनी अंबानींच्या प्री-वेडिंग पार्टीला हजेरी लावल्याचा व्हायरल दावा खोटा आहे. इलॉन मस्कच्या AI निर्मित प्रतिमा खोट्या दाव्यांसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या जात आहेत.

Story img Loader