Viral video: देशभरात गणेशोत्सव साजरा होत आहे. मोठ्या उत्सहात भक्तांनी गणेशाचे स्वागत केले आहे.मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातीलच नाही तर विदेशातूनही भाविक येतात. यावेळी मोठमोठ्या मंडळांपासून घरगुती बाप्पासाठीही आकर्षक अशी सजावट केली आहे. दरम्यान एका घरगुती गणपतीला आनंद दिघेंच्या जीवनावरील देखावा साकारण्यात आला आहे. आनंद दिघे यांच्या अनाथ आश्रमाचा देखाव्यात दाखवण्यात आलाय. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आठवणीतील दिघे साहेब

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?

राज्यामध्ये सत्तापालट घडवणारे शिवसेनेचे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांच्या आठवणींना या देखाव्यातून उजाळा देण्यात आला आहे. त्यांच्याच आठवणीत हा देखावा साकरण्यात आला आहे. टेंभी नाका ठाणे येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या “आनंद आश्रम” गणपती उत्सवात आरसरुपात साकारली. सोलापूर – होटगी रोड येथील सौरभ भांड यांच्या आर बी फ्रेंड्स ग्रुपनी गणपती समोर आनंद दिघे यांचं आनंद आश्रम साकारले आहे. याचं उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या टेंभी नाका येथील आनंद आश्रमातील तुळजाभवानी मातेच मंदिर, छत्रपती शिवरायांचं पुतळा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा, आनंद दिघे यांनी वापरत असलेल वाहन, त्यांचं स्मृती मंदिर, न्याय दरबार व अन्य गोष्टी हुबेहूब साकारल्या आहेत.

आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा

आनंद दिघे हे ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरातच लहानाचे मोठे झाले. शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर दिघेंनी कार्यालयातच राहायला सुरुवात केली. “ठाण्यातील टेंभी नाक्यावरील त्यांचे घर म्हणजेच आनंदआश्रम. त्यांनीच सर्वप्रथम टेंभी नाक्यावर जय अंबे संस्था स्थापन करून नवरात्र उत्सवाची स्थापना केली, ती आज तागायत चालूच आहे.शिवाय, त्यांनी पहिली दहीहंडी सुरू केली. धर्माशी असलेल्या त्यांच्या बांधिलकीमुळे त्यांना लोक “धर्मवीर” म्हणून ओळखले जात होते.शिवसैनिक आणि टेंभी नाका या विषयांवर चर्चा करण्यासाठी ते दररोज दरबार घेत असत. याबरोबरच गरजूंना पायावर उभं राहण्यासाठी स्टॉल उभे करूनही दिले होते.साहेब एकोपा निर्माण करुण जसे सन साजरे करायचे तोच एकोपा अजूनही आपल्या ठाण्यात जीवंत आहे. त्याच भावनेनी केलेला एक छोटासा प्रयन्त..” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लक्षात ठेवा! डाव कधीही पलटू शकतो; ‘हा’ VIDEO पाहून कळेल ‘संयम’ का महत्वाचा आहे…

अतिशय सुंदर पद्धतीने, बारकाईने हा देखावा साकारण्यात आले आहे. हा देखावा पाहण्यासाठी राजकीय नेते गर्दी करत आहेत. या देखाव्याचा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.