टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याचा व्यवहार रद्द करत असल्याचे शुक्रवारी सांगितले. ट्विटरने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला. ट्विटरकडून बनावट खात्यांची माहिती देण्यात येत नसल्याचे कारण देत मस्क यांनी ट्विटर खरेदीच्या व्यवहारातून माघार घेतली. दुसरीकडे ट्विटर हा करार लागू करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्याच्या तयारीत आहे. मस्क यांच्या या घोषणेनंतर ट्विटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. दरम्यान, भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी इलॉन मस्क यांची खिल्ली उडवली असून, त्यांना विनातिकीट प्रवासी असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महिंद्रा यांनी म्हटले आहे की मस्क यांनी करार रद्द करणे म्हणजे विनातिकिट ट्रेनमध्ये प्रवास करण्यासारखे आहे. म्हणजेच तीन महिने फुकटात ट्विटरवर मालकी सांगितल्यानंतर त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित मस्क यांनी करार रद्द केला.

मस्कल यांनी ट्विटर खरेदी करार रद्द केल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. “जर इलॉन मस्क भारतीय ट्रेनमधून प्रवास करत असता, तर तिकीट कंडक्टर त्याला विनातिकीट प्रवासी (टीटी) असे नाव दिले असते. पण आता लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी टीटीचा वापर कोणत्याही बातमीच्या मथळ्यातही केला जाऊ शकतो. जसे की Twitter Tease…,” असे आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या खरेदीची घोषणा केली होती आणि ४४ अब्ज डॉलर्सचा करार निश्चित झाला होता. मात्र, शुक्रवारी मस्क यांनी त्यांच्या वतीने हा करार रद्द करण्याची घोषणा केली. त्यांचा आरोप आहे की कंपनी ट्विटरच्या बनावट खात्यांच्या संख्येबद्दल पुरेशी माहिती देऊ शकली नाही, ज्यामुळे त्यांनी करार रद्द केला.

बनावट खात्यांचे कारण

ट्विटरच्या वाढीसाठी प्रचंड संधी असल्याचे मस्क यांनी म्हटले होते. मजकुरावरील निर्बंध उठवणे तसेच बनावट खाती नष्ट करणे अशा अनेक गोष्टी करणार असल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले होते. परंतु ट्वीटरवरील बनावट खात्यांची पुरेशी माहिती कंपनी देत नाही, त्यामुळे व्यवहार रद्द करत असल्याचे मस्क यांनी सांगितले.