अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमध्ये पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे अनेकजण या पावसाचा आनंद घेत आहेत. पावसात भिजायला अनेकांना आवडत, मग ती लहान मुलं असोत वा वयस्कर लोक. याचेचं उदाहरण देण्यासाठी महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक मजेदार आणि तितकाच मनमोहक असा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यामध्ये एक लहान मूल पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे.
आनंद महिंद्रा यांनी मुंबईताला पाऊस कसा असतो आणि पावसाळ्यात प्रत्येक भारतीयाला काय वाटतं हे सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे आनंद महिंद्रा यांनी ते पावसाळ्यात मुंबईतील घरी असताना त्यांचा मूड कसा असतो हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. या लहान मुलाचा पावसात भिजतानाचा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, शेवटी पावसाला सुरुवात झाली आणि हाच मुंबईचा पाऊस पाहण्यासाठी मुंबईला आलो. प्रत्येक भारतीयाच्या आतमध्ये असणारे लहान मूल पहिल्या पावसाचा आनंद घेताना कधीही थकत नाही.
महिंद्रा यांनी लहान मुलाचा व्हिडीओ शेअर करताच अनेकांनी नेहमीप्रमाणे त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की. “मुंबईतील मान्सून हा फक्त पाऊस नसतो, तर तो एक मौजमजा, हसण्याचा आणि आपल्यातील लपलेल्या लहान मुलाला स्वीकारण्याचा काळ असतो. मुंबईकर पावसाचा आनंद खूप घेत असतात.” तर आणखी एकाने “मी माझे बालपण विसरू शकत नाही जेव्हा मी माझ्या मित्रांसोबत मुसळधार पावसाचा भिजायचो” तर अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपापल्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. तर काहींनी पाऊस म्हणजे केवळ सुख असल्याचं म्हटलं आहे.