विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा सहा गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन ठरली. विश्वचषक फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर, देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच, उद्योगपती महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांनीही टीम इंडियाच्या पराभवानंतर आपल्या भावना एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर केल्या आहेत.
आनंद महिंद्रांनी पोस्ट करत लिहिले की, “टीम इंडिया प्रत्येक प्रकारे अप्रतिम खेळत होती आणि ज्यांच्या टीम इंडिया कडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांच्या खूप पुढे आपली भारतीय क्रिकेट टीम पोहोचली. आपल्याला आता आधी पेक्षाही जास्त आपल्या भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देण्याची गरज आहे.” आनंद महिंद्रा हे या वर्ल्डकपमध्ये सुरुवातीपासूनच टीम इंडियाचा उत्साह वाढवत आहेत.
ते पुढे बोलताना म्हणाले, “आयुष्यात माणसाने स्वतःचे नुकसान स्वीकारले पाहिजे आणि आयुष्यात पुढे जायचे असेल तर यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. म्हणून मी एक फोटो शेअर करत आहे जे मला आता कसे वाटते हे प्रामाणिकपणे बोलते.” असे ते पोस्ट करत म्हणाले.
(हे ही वाचा : ग्लेन मॅक्सवेलच्या ‘या’ कृतीवर हिटमॅन रोहित शर्माची बायको रितिका संतापली; रिअॅक्शन होतोय व्हायरल )
येथे पाहा फोटो
पोस्टवर लोकांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया
एका व्यक्तीने लिहिले, “खेळ खरोखरच आपल्याला नम्रता शिकवतो. टीम इंडियाचा प्रवास अपेक्षेपेक्षा जास्त अविश्वसनीय होता. त्यांना आता पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे आणि तुम्ही बरोबर सांगत आहात, नुकसान झाल्यास ते मान्य करुन पुढे सरसावले पाहिजे.”
आणखी एकाने शेअर केले, “आयुष्यात आणि क्रिकेटच्या खेळात, भावनांचा स्वीकार करणे हे ताकदीचे लक्षण आहे. टीम इंडियाने, अभिमान वाढवला आहे.”
तिसरा व्यक्ती म्हणाला, “एकदम सहमत! खेळ हा आपल्याला नम्रता शिकवण्याचा आणि एकत्र आणण्याचा अनोखा मार्ग आहे. चला टीम इंडियाला आपला अटळ पाठिंबा दर्शवूया, तर चौथा म्हणाला, आम्हाला टीम इंडियाचा अभिमान आहे.”
ही पोस्ट १९ नोव्हेंबरला शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून त्याला नऊ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या शेअरला १२,००० हून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स देखील आहेत.