Anand Mahindra Viral Tweet: महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे ट्विटरवर नेहमीच ऍक्टिव्ह असतात. अनेकदा आपल्या ट्विटरवरील फॉलोवर्सशी ते मजेशीर संवाद साधतात, त्यांना कोडी विचारतात, भन्नाट उत्तरे रिपोस्ट करून कौतुक करतात एकूण काय तर आनंद महिंद्रा व त्यांच्या फॉलोवर्सचे संबंध तसे घनिष्ठ आहेत. पण कितीही जवळचं नातं असलं तरी त्याला काही मर्यादा असतात आणि काही वेळा ऑनलाईन युजर्सना याचा विसर पडतो. असाच काहीसा प्रकार आता आनंद महिंद्रा यांच्याबाबत घडल्याचे समजत आहे. एका ट्विटर फॉलोवरने आनंद महिंद्रा यांना थेट ज्यांच्या जावयावरून सुनावले आहे. ज्याला प्रत्युत्तर देताना महिंद्रा यांनीही मोजक्याच शब्दात चांगलाच समाचार घेतला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण चला पाहुयात..
आनंद महिंद्रा यांनी अलीकडेच आपल्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट केली होती. यात त्यांनी Croissant या पदार्थाच्या मजेशीर उच्चाराचा एक फोटो पोस्ट केला होता यावर कॅप्शन देताना महिंद्रा यांनी लिहिले की, “ठीक आहे, निदान माझ्या फ्रेंच जावयाला असे वाटते की Croissant हा सर्व वेदनांवर एक उपाय आहे आणि आपण भारतीयांनी संक्षिप्त सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग भाषेवर प्रभुत्व मिळवले आहे. मग का नाही?” याच ट्वीटवर एका व्यक्तीने प्रतिक्रिया देत, माझा काही संबंध नाही पण तरीही तुम्ही भारतीय जावई का नाही निवडला असा थेट प्रश्न केला होता.
आनंद महिंद्रा ट्वीट
आनंद महिंद्रा यांनी या महाशयांना दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. महिंद्रा म्हणाले की, “बरोबर जसा तुमचा काही संबंध नाही तसाच माझाही काही संबंध नाही. माझ्या मुली त्यांचे निर्णय स्वतः घेऊ शकतात व त्यांचे जोडीदारही त्यांनीच निवडले आहेत, मला त्यांचा यामुळे अभिमान वाटतो”
आनंद महिंद्रा ट्वीट
हे ही वाचा << गौतमी पाटीलचा अश्लील नाच थांबवा, नाहीतर गृह मंत्रालय..; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कठोर शब्दात पत्र
आनंद महिंद्रा यांच्या या प्रतिक्रियेला आतापर्यंत १० हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत तर ५०० जणांनी केवळ महिंद्रा यांचा हा प्रगत विचार रिट्विट केला आहे. महिंद्रा यांच्या विनयशील उत्तराचे कौंटुक करताना अनेकांनी असे खाजगी प्रश्न विचारणाऱ्या युजरलाही सुनावले आहे.