बुधवारी झालेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली फलंदाजीमध्ये कमाल करू शकला नसला तरी अफगाणिस्तानला पाच धावा घेण्यापासून रोखण्यात त्याला यश आले. सामन्या दरम्यान हवेत उंच झेप घेत चेंडू झेलतानाचा क्षण कॅमेऱ्याच कैद झाला. याचे फोटो-व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “थंडीत अंघोळ न करणाऱ्यांसाठी व्यक्तीने सुरु केला नवा बिझनेस; आनंद महिंद्रांनी व्हिडीओ शेअर करत केले कौतुक

भारतीय संघ आणि अफगाणिस्तान यांच्यात बंगळुरूमध्ये एक अतिशय रोमांचक सामना पार पडला. प्रथम दोन्ही संघांमधील सामन्यात टाय झाला होता. यानंतर सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघ केवळ १६-१६ धावाच करू शकले आणि ही सुपर ओव्हरही टाय झाली. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला.

सामन्यादरम्यान, षटकार मिळवण्याच्या आशेने नजीबुल्ला झद्रानने सीमा रेषेकडे चेंडू भिरकावला होता. पण विराट कोहीलीने सुपरमॅन सारखी हवेत झेप घेत चेंडू झेलला. मात्र त्याच वेळी त्याचा तोल गेला पण त्यातही स्वत:ला सावरत कोहलीने हुशारीने चेंडू मैदानात जितका शक्य होईल तितका दूर फेकला ज्यामुळे षटकार रोखला. हाच क्षण सामन्यासाठी निर्णायक ठरला. या क्षणाचे फोटो- व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हा फोटो शेअर करत महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी थेट न्युटनला प्रश्न विचारला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हॅलो, Isaac न्युटन? या गुरुत्वाकर्षण विरोधी घटनेबाबत भौतिकशास्त्राचा नवीन नियम स्पष्ट करण्यात तुम्ही आम्हाला मदत करू शकता का?” महिंद्रा यांच्या या पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

हेही वाचा – IND vs AFG: विराट कोहलीची सुपरमॅन झेप पाहून प्रेक्षक झाले थक्क; एका हाताने चेंडू पकडताना खाली पडला पण..

एकाने लिहिले,”विराट कोहलीने कल्पनेच्या पलीकडे आणि विश्वास न बसणारी कामगिरी केली आहे. दुसरा म्हणाला, “स्टेडियममध्ये हे दृश्य प्रत्यक्षात पाहण्याचा अभिमान वाटतो आणि स्टेडियममधील गर्दी ज्या प्रकारे कोहली-कोहली ओरडत होती, ते अविश्वनीय होते.” तिसर्‍याने लिहिले, “न्यूटन, कोहलीला भेटा, जिथे भौतिकशास्त्राचे नियम कालबाह्य होतात आणि क्रिकेटचे नियम लागू होतात.”

Story img Loader