T20 World Cup Finals Prediction: T20 विश्वचषक 2022 अंतिम सामना येत्या रविवारी म्हणजेच १३ नोव्हेंबरला पार पडणार आहे. कोणता संघ ट्रॉफी घरी घेऊन जाईल याबाबत अनेक कयास बांधले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांचे एक खास ट्वीट चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या निकालाचे अंदाज एका खास ‘तज्ज्ञाला’ विचारले आहेत. यासाठी महिंद्रा यांनी जो निकष वापरला ते पाहून नेटकरी मात्र हसून हैराण झाले आहेत. आनंद महिंद्रा यांचं हे ट्वीट नेमकं काय आहे, चला तर पाहुयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे अंदाज वर्तवले आहेत. या व्हिडिओमध्ये कुत्रा विचित्रपणे भिंत आणि झाड यांच्यामध्ये बॅलन्स साधून भिंतीच्या पलीकडे पाहत असल्याचे दिसतआहे. महिंद्रा यांनी या व्हिडिओला कॅप्शन देत म्हंटले की, “मी या कुत्र्याला भविष्य पाहण्यास सांगितले. #T20WorldCup2022 च्या फायनलमध्ये कोण असेल हे विचारले असता कुत्र्याने भिंतीकडे डोकावून पहिले, तुम्हाला काय वाटतं त्याने काय पाहिले असेल?”

आनंद महिंद्रा ट्वीट

IND vs ZIM Video: आश्विनला वाटलं कॅमेराचं लक्ष नाही, रोहित शर्मा बोलत असताना भरमैदानतच टीशर्टचा वास…

आनंद महिंद्रा यांच्या ट्विटला उत्तर देताना, एका ट्विटर युजरने लिहिले की, “भिंतीच्या पलीकडे तर दिसत नाही पण जे ऐकू आले त्यावरून असा अंदाज आहे की पाकिस्तान अंतिम फेरीत आहे….” तसेच अन्य एका युजरने लिहिले की कुत्र्याला पलीकडे २ शेजारी वाद घालताना दिसले त्यामुळे अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान निश्चित लढणार हे दिसत आहे.

दरम्यान, टी २० विश्वचषकात भारत इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत खेळणार आहे, तर पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होईल. या सेमी फायनलमधील विजेते संघ १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर अंतिम विजेतेपदासाठी लढणार आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra asks t20 world cup finals predictions time to expert in ind vs pak funny viral tweet svs