महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे ट्विपलमध्ये म्हणजेच ट्विटवर असणाऱ्या नेटकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. अगदी प्रेरणादायक सुविचार असो किंवा भन्नाट व्हिडिओ असो महिंद्रा सतत काही ना काही ट्विटवरुन शेअर करत असतात. कधी कधी ते ट्विटवरुन मिळालेल्या सल्ल्यावरुन निर्णयही घेताना दिसतात. तर कधी ते ट्विटवरुन मदत करतात. मंगळवारी त्यांनी अशाच एक भन्नाट बसचा फोटो ट्विट करत या फोटोला कॅप्शन देण्यास सांगितली आहे. महिंद्रा यांच्या फॉलोअर्सनेही त्यांचे हे चॅलेंज स्वीकारले असून शेकडो ट्विपल्सने या फोटोसाठी कॅप्शन सुचवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आनंद महिंद्रांनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘मी कॅप्शनची स्पर्धा घेऊन बराच काळ झाला आहे. चला आज परत घेऊयात ही स्पर्धा. तर हा आहे आजचा फोटो ज्यासाठी तुम्हाला कॅप्शन द्यायची आहे. कॅप्शन इंग्रजी, हिंदी किंवा हिंग्लीश (हिंदी आणि इंग्रजी एकत्र करुन) भाषेत असली तरी चालेल. उद्या (बुधवार) सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्ही कॅप्शन देऊ शकता. विजेत्यांना महिंद्रा गाड्यांच्या छोट्या प्रतिकृती भेट म्हणून दिल्या जातील.’

महिंद्रांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये एक पिवळ्या रंगाची बस असून त्या बसचे छप्पर म्हणजेच बसचीच प्रतिकृती आहे. म्हणजेच एका साध्या बसच्या छपरावर दुसरी बस उलटी ठेवल्यासारखं वाटावं अशी या बसची डिझानी इहे.

महिंद्रांनी हे ट्विट केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये यावर सहा हजारहून अधिक जणांनी रिप्लाय करुन आपली कॅप्शन सुचवली आहे. चला तर मग तुम्ही पण ट्राय करा या फोटोला कॅप्शन द्या आणि महिंद्रांकडून खास भेटवस्तू जिंका.