प्रसिद्ध उद्योगपती तसंच महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी शेअर केलेले अनेक व्हिडीओ लोकांना हसवतात तर काही व्हिडिओ भावूक करतात. मात्र यावेळी त्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी नुकतीच लाँच झालेली महिंद्रा कंपनीची नवीन कार स्कॉर्पिओ एन कार खरेदी केली आहे आणि त्यासोबत त्यांनी नवीन कारचा फोटो देखील शेअर केला आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे आनंद महिंद्रा यांनी ही आनंदाची बातमी देताना त्यांच्या चाहत्यांना या कारला नवीन नाव सुचवा अस सांगितलंय. लोकांनी देखील यावर मजेशीर नावं सुचवली आहेत.

आनंद महिंद्रा यांनी खरेदी केली स्कॉर्पिओ एन

महिंद्रा कंपनीच्या नवीन कार स्कॉर्पिओ एनची चर्चा खूप दिवसांपासून होत आहे. हे मॉडेल जुन्या स्कॉर्पिओपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. लोकांनी त्याची बुकिंगही सुरू केली आहे. त्याचवेळी हे नवीन मॉडेल महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांच्या घरीही पोहोचले आहे. ही आनंदाची बातमी देताना आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, “आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे. मला माझी स्कॉर्पिओ एन मिळाली, त्यासाठी चांगले नाव सुचवा..तुमच्या सूचनांचे स्वागत आहे.” आनंद महिंद्रा यांनी नाव सुचवायला सांगताच अनेकांनी यावर कंमेंट करायला सुरुवात केली आहे.

Sam Konstas Fan Crashes His Car While Trying to Take with Australian Opener Video Goes Vira
VIDEO: सॅम कॉन्स्टासला भेटण्यासाठी चाहत्याने केली घोडचूक, चालत्या गाडीतूनच उतरला अन्…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Video : Which is the most beautiful beach in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनारा कोणता? व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले, “महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे”
madhuri dixit car Ferrari 296 GTB price
Video: माधुरी दीक्षितने घेतली आलिशान गाडी, किंमत वाचून थक्क व्हाल
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Mandhardev , Kalubai yatra, devotees ,
मांढरदेव यात्रेला सुरुवात, ‘काळूबाई’च्या जयघोषात हजारो भाविक दाखल
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”

( हे ही वाचा: प्रेम कधीच म्हातारे होत नाही! थरथरत्या हातांनी पतीचा हात धरत तिने गायले गाणे….रुग्णालयातील हृदयस्पर्शी व्हिडिओ एकदा पाहाच)

( हे ही वाचा: Baba Vanga: नवीन युगातील बाबा वेंगा बनली ‘ही’ १९ वर्षीय युवती; २०२२ मध्ये तिने केलेल्या ‘या’ भविष्यवाण्या ठरल्यात खऱ्या)

लोकांनी सुचवली वेगवेगळी नावे

आनंद महिंद्रा यांच्या स्कॉर्पिओ एन या नवीन कारसाठी लोकांनी वेगवेगळी नावे सुचवली आहेत. एसके अहिरवार यांनी या गाडीचे नाव निष्क असे सुचवले आहे. प्राचीन काळी वापरल्या जाणाऱ्या निष्क या सोन्याच्या नाण्यावरून त्याचे नाव असावे असे त्याने लिहिले आहे. रुद्र नावाच्या युजरने लिहिले की, त्याचे नाव योगेंद्र असावे. हे नाव परमवीर चक्र विजेत्याचा खरा सन्मान असेल. महिंद्रा स्कॉर्पिओ भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल केली जाईल, म्हणून ते योग्य नाव असेल. एका युजरने त्याला हेड्स असे नाव सुचवले आहे. हेड्स स्कॉर्पिओ अधोलोक ग्रीक देव आहे. तर एकाने याला धन्नो नाव ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Story img Loader