९ जून रोजी झालेल्या रोमहर्षक सामन्यात न्यू यॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर २०२४च्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला ६ धावांनी पराभूत केले. भारतीय संघाच्या खेळाडूंनी ११९ धावांचे माफक लक्ष्य ठेवले आणि भारताविरुद्धच्या आठव्या T20 विश्वचषक सामन्यांमध्ये पाकिस्तानचा सातव्यांदा पराभव केला आहे.
या विजयानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला. काहींनी मजेशीर मीम्स शेअर केले तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान या सर्वांमध्ये आनंद महिंद्रा यांच्या प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महिंद्रा यांनी भारतीय संघावर गंभीर क्रुरतेचा आरोप केला आहे. महिंद्रा यांची प्रतिक्रिया संपूर्ण वाचल्यानंतर नेटकऱ्यांना हसू रोखणे अशक्य झाले आहे.
आनंद महिंद्रा यांनी हटके शैलीत भारतीय संघाच्या नाट्यमय कामगिरीचे कौतुक केले आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “ आमच्या भारतीय पुरुष क्रिकेट संघावरम मी गंभीर क्रूरतेचा आरोप करतो. तुम्ही संपूर्ण देशाला-आमच्या वायव्यकडेली शेजारी देशाला(पाकिस्तानला आधी भारताचा अपमानास्पद पराभव घडवून आणण्याच्या मार्गावर नेत असल्याचा विश्वास दिला आणि नंतर तुम्ही हार पत्करली नाही आणि राभवाच्या मुखातून सामना परत हातात घेतला आणि पूर्णपणे अशक्य वाटणारा विजय हिरावून घेतला. तुम्ही हा अपमान भेट म्हणून त्यांना दिला कारण विकेट्स शिल्लक असतानाही त्यांना आपली तुटपूंजी(कमी असलेली) धावसंख्या गाठता आली नाही. तुम्ही त्यांची भावनिक हानी केली आहे जी अगणित आहे. मी तुला कायमचे हिरो होण्याची शिक्षा देतो,”
या विजयाने केवळ चाहत्यांना आनंद दिला नाही, तर प्रमुख भारतीय ब्रँड्सच्या अनेक विनोदी आणि क्रूर सोशल मीडिया पोस्ट्सना प्रेरित केले. या विजयानंतर झोमॅटोने पाकिस्तनाला टोमणा मारला, “प्रिय पाकिस्तान, आमच्या सर्वात वाईट दिवसातही, आम्ही अजूनही चांगली बाजूला आहोत.” तर स्विगीने एक भन्नाट डूडल शेअर केले आहे, ज्याला “ 2nd down. INDvsPAK,” असे कॅप्शन देण्यात आले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या इंस्टाग्राम खात्याला टॅग करत उबर इंडियाने एका व्हायरल संदर्भाला टॅप करत पोस्ट केले, “भारतीय संघाच्या या यू-टर्नने तर अचानक काळ बदलला, भावना बदलले, विजयाबद्दल अभिनंदन!”
या पराभवासह, पाकिस्तान २०२४ च्या T20 विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे, तर भारताने आणखी एका संस्मरणीय विजयाचा गौरव केला आहे.