Anand Mahindra Wishes Janmashtami With Deep Message:  देशभरात दहीहंडी सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईत नाक्या-नाक्यावर गल्ली बोळ्यात बाळगोपाळ थरावर थर रचून दहीहंडी फोडण्याचा आनंद घेत आहेत. यानिमित्ताने लोकांना उत्साहाचा वेगळा माहोल अनुभवता येतोय. तर दुसरीकडे सोशल मीडियावरही दहीहंडीनिमित्त लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. अनेक व्हिडीओ शेअर करत आहेत. अशाच देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील दहीहंडीनिमित्त एक फोटो पोस्ट केला आहे, यासह त्यांनी सर्वांना कृष्ण जन्माष्ठमीच्या शुभेच्छा दिल्या, इतकेच नाही त्यांनी दहीहंडीची वर्षानुवर्षे सुरु असलेली परंपरेतून बोध घेत आयुष्यात यशाच्या शिखरारवर पोहोचण्यासाठी तीन कानमंत्र दिले आहेत.

आनंद महिंद्रा दिला यशाचा कान मंत्र

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दहीहंडी सोहळ्याचा एक जबरदस्त फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कॅमेरा अँगल अशापद्धतीने घेतला आहे, जो पाहताना दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांचे पथक डोक्यावरून उडणाऱ्या विमानाला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचा भास होतो. फोटोसह
त्यांनी यशाचा एक कानमंत्र दिला आहे, ज्यात त्यांनी “3C” ची संकल्पना स्पष्ट केली आहे हे तीन C म्हणजे conviction, commitment and collaboration (दृढविश्वास, वचनबद्धता आणि सहयोग).

raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा म्हणाले की, आज दहीहंडीच्या निमित्ताने मी हा फोटो शेअर करत आहे, कारण हे मानवी पिरॅमिड बनवण्यात महत्त्वाचा आहे, विश्वास, बांधिलकी आणि सहकार्य. हेच माझे #MondayMotivation आहे. तुम्ही आयुष्यात कितीही मोठी आव्हान असून द्या,तुम्ही या तीन C च्या मदतीने यशाचे शिखर गाठू शकता.

महिंद्राने दिलेल्या यशाच्या कानमंत्रांचे लोकांनी केले कौतुक

आनंद महिंद्रा दर सोमवारी एक प्रेरणादायी पोस्ट शेअर करत असतात आणि त्यातून लोकांना आयुष्यात यशस्वीरित्या पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत असतात,मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतात.

read more trending news : Dahi Handi 2024 : “भारीच नाचला आपला भाऊ” मुंबईतील दहीहंडी उत्सवातील कधीही जुना न होणारा Video, पाहून हसून हसून व्हाल लोटपोट

यावेळी त्यांनी दहीहंडीनिमित्त उभारलेल्या मानवी मनोऱ्यातून प्रेरणा घेत यशाचा कानमंत्र दिला आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले आहे की, किती छान कनेक्शन! दहीहंडी उत्सवादरम्यान तयार झालेली मानवी मनोऱ्याचे हे दृश्य दृढनिश्चय, वचनबद्धता आणि सहकार्याच्या शक्तीचे अचूक प्रतिनिधित्व करते.कोणत्याही क्षेत्रात किंवा प्रयत्नात यश मिळविण्यासाठी हे तीन ‘C’ खरोखर आवश्यक आहेत.

दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, माझा विश्वास आहे की ही तत्त्वे केवळ मानवी मनोरेच तयार करण्यासाठीच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये आवश्यक आहेत. तिसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, मला दहीहंडी स्पर्धा पाहायला आवडते. ही अतिशय खेळाडूवृत्ती, चिकाटी आणि सहकार्याचे उत्तम उदाहरण दर्शवणारी स्पर्धा आहे.

Story img Loader