उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. चांगल्या वाईट गोष्टींची त्यांना परख आहे. वेळोवेळी ते पोस्टच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. चांगल्या कामाचं ते नेहमी कौतुक करतात आणि मदत किंवा बक्षीसही देतात. आतापर्यंत आनंद महिंद्रा यांनी अनेकांना मदत तसेच वडिलकीचा सल्ला दिला आहे. तसेच भारताचं नाव उंच करण्याऱ्या खेळाडूंचा गौरवही केला आहे. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेवेळी त्यांनी खेळाडूंना गाडी देण्याचा शब्द दिला होता. आता टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवणाऱ्या अवनी लेखराला XUV700 दिली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी शब्द दिला होता. खासकरून या गाडीची पुढच्या दोन सीट्स कस्टम केल्या आहेत. दिव्यांग व्यक्तींना यात आरामात चढता-उतरता आणि बसता येणार आहे. तसेच पुढची सीट पाठीपुढे होते आणि बाहेर निघते. त्यामुळे आरामात बसता येतं. गाडीत बसल्यांतर रिमोटच्या सहाय्याने सीट आत घेता येते. दिव्यांग व्यक्तींना मोठ्या गाड्यांमध्ये बसताना समस्या येते. ही बाब लक्षात घेऊन सीटवर सरळ व्हिलचेअर घेऊन बसता येतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा