२९ जून रोजी झालेल्या टी-२० विश्वचषक सामन्यामध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला होता. भारतीय संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. भारतीय संघाचा हा विजय संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषाने साजरा झाला. ४ जुलै रोजी भारतीय संघ भारतात दाखल झाला आणि विमानतळावर चाहत्यांनी भारतीय संघाचे जोरदार स्वागत केले. कर्णधार रोहित शर्माने ट्रॉफीसह चाहत्यांना भेट दिली. दरम्यान विजय उत्सव परेडनंतर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मरिन ड्राईव्हची त्वरित साफसाफई सुरु केली. आनंद महिंद्रा यांनी 4 जुलै रोजी मुंबई साफसफाई केल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) कौतुक केले आहे.
मरिन ड्राईव्ह येथील भारतीय क्रिकेट चाहत्यांची गर्दी जसजशी कमी झाली, तसतसे खराब झालेल्या कार आणि विखुरलेल्या चप्पलांचा खच पडला होता. तुटलेला खांबही दिसत आहे. विजयाच्या उत्सवादरम्यान चाहते कारच्या छतावर चढले, नाचले आणि नुकसान केले. दरम्यान, महापालिकेने चाहत्यांची गर्दी कमी होताच मरिन ड्राईव्हची साफसाफई सुरु केली आणि सर्व परिसर पुन्हा चकाचक केला. मुंबई महापालिकेच्या या कामाचे एका सोशल मीडिया युजरने कौतुक केले आहे. वैभव कोकट यांनी महापालिकेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि महापालिकेचे आभार मानले, “विश्वचषक विजयाची परेड साजरी करणारे नागरिक जागे होण्यापूर्वीच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मरीन ड्राइव्ह परिसराची साफसफाई केली होती. आदल्या रात्री मरीन ड्राइव्ह परिसर हजारो शूज आणि सँडलने भरलेला होता आणि हे कामगार पहाटेपर्यंत कचरा काढण्यात व्यस्त होते.”
“सकाळपर्यंत त्यांनी मुंबई पुर्वस्थितीत आणली होते. या कामगारांप्रती आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. दोन व्हिडिओ जोडले केले आहेत, एक रात्रीचा आणि एक सकाळचा,” असेही त्यांनी पोस्टमध्ये लिहिले. दरम्यान आनंद महिंद्रा यांनी वैभवची पोस्ट शेअर केली आणि महापालिकेच्या कामाचे कौतुक केले.
आपल्या पोस्टमध्ये महिंद्रा म्हणाले, “वैभव तुझे मत अगदी बरोबर आहे. मी तुमच्याशी अधिक सहमत आहे. मी विचार करत होतो की, “साफसफाईला किती वेळ लागला असेल. महापालिकेच्या टीमने साहजिकच भव्य परेडनंतर झालेला कचरा साफ करण्यासाठी रात्रभर काम केले. हेच (मुंबई) शहराला जागतिक शहर बनवते. फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नाही.. पण हा अॅटीट्युड.”
महिंद्राच्या यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आणि महापालिकेच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
हेही वाचा- पुणेकरांनो, शनिवार-रविवार सिंहगडावर जाण्याचा विचार करताय? थांबा आधी हा Viral Video बघा
“स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रात्रभर अथक परिश्रम केले आणि आम्ही बाहेर पडलो तोपर्यंत शहर पुन्हा मूळ स्थितीत आले होते याची खात्री करून घेतली. त्यांचे समर्पण आणि कठोर परिश्रम खरोखरच प्रेरणादायी आहेत आणि आपण सर्वांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. चला तर मग, या अतुलनीय कार्यकर्त्यांना टाळ्या वाजवू या. ते खरे चॅम्पियन आहेत!” एका वापरकर्त्याने लिहिले.
त्याच वेळी, चाहत्यांनी पुरेशी योग्य सामाजिक वर्तणूक न दाखवल्याने काहीजण नाराज झाले.
एका वापरकर्त्याने पोस्ट केले, “भारतीय म्हणून आपल्याला अधिकसामाजिक वर्तणूकीचे ज्ञान असले पाहिजे आणि शहराचा कचरा न टाकण्यासाठी आपण जबाबदार असले पाहिजे.