महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी उदयपुरचे युवराज लक्षराज सिंग मेवर यांना महिंद्रा कंपनीची थार ७०० ही गाडी दिली आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्राने थार ७०० या गाड्यांची निर्मिती बंद केली आहे. यापैकीच शेवटची गाडी महिंद्रांनी उदयपुरच्या युवराजांना भेट दिली आहे. या गाडीची किंमत ९ लाख ९९ हजार इतकी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘उदयपूरमधील राजघराणे असलेल्या मेवार कुटुंबाला गाड्यांची आवड आहे. याच आवडीमधून त्यांनी २० वर्षांपूर्वी शहरामध्ये गाड्यांचे संग्रहालय स्थापन केले आहे,’ असे कारटॉक या वेबसाईटने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

महिंद्रा अॅण्ड महिंद्राने जून महिन्यात थार ७०० या गाडीची उत्पादन बंद करणार असल्याची माहिती दिली. आज २ हजार ७० कोटी अमेरिकन डॉलर इतका मोठा कारभार असणाऱ्या महिंद्रा कंपनीची सुरुवात १९४९ झाली. तेव्हापासून कंपनीने या गाडीची निर्मिती सुरु केली होती. ही गाडी म्हणजे कंपनीच्या ७० वर्षांच्या वाटचालीची साक्षीदार राहिली आहे. मात्र जूनमध्ये या गाडीचे शेवटचे ७०० गाड्यांचे युनिट तयार करण्यात आले. याच युनिटमधील शेवटच्या गाडीची चावी महिंद्रांनी उद्यपुरच्या युवराजांना दिली. महिंद्रा आणि युवराज दोघांनीही ट्विटवरुन यासंदर्भात माहिती दिली.

यावर वाचकांनाही अनेक कमेंट केल्या आहेत.

तीन ग्रेट गोष्टी एकाच फोटोत

भारीच

भन्नाट

भारी गाडीय ही

मस्त

मात्र यामध्ये अनेकांनी तुम्ही ही कार युवराजांना मोफत दिली का असा सवाल विचारला. यावरही आनंद महिंद्रांनी ट्विट करुन उत्तर दिले आहे.

आता या गाडीचा उद्यपूरच्या राजमहलामधील व्हिंजेट कार्सच्या कलेक्शनमध्ये समावेश होणार आहे. या कलेक्शनमध्ये अनेक गाड्यांचा समावेश असून त्यामध्ये रोल्स रॉयल घोस्ट गाडीचाही समावेश आहे.