महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी एक्स (ट्विटर)वर शेअर केलेल्या अनेक पोस्ट युजर्सना आवडतात. त्यात अनेक मजेशीर, जुगाड व्हिडीओ, तसेच काही प्रेरणादायी पोस्टसुद्धा असतात; ज्या अनेकांचे लक्ष वेधून घेतात. तर नेहमीच जुगाड तंत्रज्ञानावर लक्ष ठेवून असणाऱ्या आनंद महिंद्रानी एक व्हिडीओ शेअर केला आहे. लहान मुलांना स्वच्छता, नीटनेटकेपणाची सवय लावण्याची कल्पना त्यांना या व्हिडीओद्वारे मिळाली आहे.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत एक वर्ग आहे. या वर्गात काही मुलांना बसण्यासाठी बाक ठेवले आहेत. शिक्षिका वर्गात येते आणि काही खेळणी, अनेक वस्तू व वर्गातील खुर्च्या इकडे-तिकडे सरकवून ठेवते आणि संपूर्ण वर्गात पसारा करून ठेवते. त्यानंतर शिक्षिका विद्यार्थ्यांना बोलावून घेते व सगळ्यांना वस्तू जागच्या जागी ठेवण्यास सांगते. तसेच काही वेळात सर्व विद्यार्थी एकमेकांची मदत करून सगळ्या वस्तू जागेवर ठेवतात. लहान मुलांना कशाप्रकारे स्वच्छतेचे धडे गिरवले जात आहेत, एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.
हेही वाचा…सोशल मीडियाची ताकद! तरुणाला केरळमध्ये हरवलेले एअरपॉड मिळाले ‘अशा’ खास पद्धतीत; पोस्ट व्हायरल
व्हिडीओ नक्की बघा :
आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ पाहिला आणि त्यांच्या एक्स (ट्विटर) वर रिपोस्ट करून लिहिले की, “काय कल्पना आहे…स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि एकमेकांना सहकार्य हे गुण आपल्या मूळ स्वभावात कसे अंतर्भूत करावे याचे उत्तम उदाहरण… आपणसुद्धा अंगणवाडी (प्री स्कूल) आणि प्राथमिक शाळांमध्ये असा सराव केला पाहिजे”, अशी इच्छा त्यांनी कॅप्शन लिहून व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांच्या एक्स (ट्विटर) @anandmahindra या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. एक युजर म्हणतोय की, या गोष्टी मुलांना घरीच शिकवण्यात आल्या पाहिजेत. तर दुसऱ्या युजरचे म्हणणे आहे की, काही ठिकाणी अशा योजना शाळेत राबवल्या जातात; तर तिसऱ्या युजरने कमेंट केली आहे की, मुलं अशा गोष्टी फक्त शाळेतच उत्साहाने करताना दिसतात.