Anand Mahindra Share Video: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते रोज काही न काही नवीन पोस्ट शेअर करत असतात. त्यांना जर एखादी पोस्ट किंवा योजना आवडली तर ते आपल्या अकाउंटवरून नेहमीच त्या इतरांबरोबर शेअर करत असतात आणि बाकी लोकांना सुद्धा अशा गोष्टींसाठी प्रोत्साहित करत असतात. आनंद महिंद्रा आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्याला आश्चर्यचकित करत राहतात. आनंद महिंद्रा यांचे एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडल मनोरंजक, प्रेरणादायी आणि विनोदी ट्विट्सने भरलेले आहे. आता असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक्सवर शेअर केला आहे, जो सध्या प्रचंड व्हायरल होतोय. ज्याने सर्व लोकांनाच थक्क केले आहे. चला पाहूया त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?
या जगात क्रिएटिव्ह लोकांची कमतरता नाही. काहीतरी नवीन करण्याची क्षमता प्रत्येकातच दिसते आहे. याचे काही ना काही उदाहरण आपण सोशल मीडियावर पाहतोच. या क्रमात, एका व्यक्तीने सायकलवर आपल्या क्रिएटिव्ह डोक्याचा वापर केला, जे पाहून आनंद महिंद्राही हैराण झाले आहेत. काय केलं त्या व्यक्तीने जाणून घ्या.
आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, सायकलला गोल चाकांऐवजी चौकोनी चाके लावलेली दिसत आहेत आणि तो सायकल चालवणारा व्यक्ती चौकोनी चाके लावलेली सायकल अतिशय सहजतेने चालवताना दिसतोय, त्याला सायकल चालवतांना पाहून आनंद महिंद्राही हैराण झाले आहेत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी तो सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. आनंद महिंद्रांनी व्हिडीओ शेअर करुन लिहिले, “माझा एकच प्रश्न आहे, का?”.
(हे ही वाचा : भारत-पाकिस्तानमध्ये कोणती सीमा आहे? तिची लांबी किती? उत्तर वाचून पोट धरुन हसाल; १२ वी च्या मुलाची उत्तरपत्रिका व्हायरल )
व्हिडिओ येथे पाहा
लोकांनीही दिली आपली प्रतिक्रिया
सोशल मिडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ ही बातमी लिहिपर्यंत ४६ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, “हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही त्यावर कमेंट करू शकता यासाठी पोस्ट करण्यात आलेला दिसतोय.” तर दुसर्या वापरकर्त्याने लिहिले, “आपण चाकांचा नव्याने आविष्कार करु शकता हे सिद्ध करण्यासाठी.” अशा प्रकारे अनेक लोकांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.