महिंद्रा आणि महिंद्राचे संस्थापक आनंद महिंद्रा यांनी या डब्बेवाल्यांसाठी एक मनोरंजक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या पोस्टमध्ये एक ट्विस्ट आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की, लंडनमधील एक कंपनी मुंबईच्या डब्बेवाल्यांप्रमाणे कापडात गुंडाळलेले स्टिकलचे डब्बे पुरविताना दिसत आहे.
आनंद महिंद्रा यांनी एक्सवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मुंबईतील प्रसिद्ध डब्बावाल्यांकडून प्रेरणा घेऊन लंडनस्थित Dabbadrop नावा्या कंपनीने देखील ही अन्न वितरण प्रणाली निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे असे दिसते.
व्हिडिओमध्ये दिसते की,, डब्बा देणारी ही कंपनी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या कंटेनरऐवजी पारंपारिक भारतीय स्टील जेवणाचे डब्बे वापरते. मुंबईच्या डब्बेवाल्यांप्रमाणेच ही डब्बे रंगेबेरंगी कापडात गुंडाळले जातात. सायकलवर काही लंडनमधील लोक डब्बे घेऊन जाताना दिसतात. भारतामध्ये ब्रिटीशांनी केलेल्या ऐतिहासिक वसाहतीकरणाचा प्रभाव दिसून येतो त्याचप्रमाणे आता पाश्चिमात्य देशांमध्ये भारताच्या सांस्कृतीचा प्रभाव दिसून येतो ज्याला reverse colonisation असे आनंद महिंद्रानी म्हटले आहे. आनंद महिंद्रा यांच्या एक्सवर पोस्टचे कॅप्शन लिहिले की, ” यापेक्षा अधिक चांगला किंवा अधिक ‘स्वादिष्ट’ असा reverse colonisationचा पुरावा नाही.
हेही वाचा – “…अथवा पोकळ बांबूचे”, रिक्षावाल्याने पुणेरी पाटी लावून जोडप्यांना दिली ताकीद, पाहा Viral Photo
महिंद्राची पोस्ट पहा:
ऑनलाइन शेअर केल्यापासून, व्हिडिओला एक्सवर एकलाख व्ह्यूज मिळाले आहेत. आपल्या देशाने प्रेरित केलेल्या अशा नवकल्पनांबद्दल जाणून घेऊन लोकांना आनंद झाला.
“डब्बा पुरवणारी सेवा मुंबईच्या प्रसिद्ध डब्बेवाल्यांच्या सेवेपासून प्रेरित आहे,” असे एका वापरकर्त्याने सांगितले. “भारत इतरांना प्रेरणा देत आहे,” दुसरा म्हणाला.
शतकाहून अधिक काळापूर्वीची, मुंबईची डब्बावाला प्रणाली घरे आणि कार्यालये जोडते, मुख्यत: गजबजलेल्या शहरातील हजारो कर्मचाऱ्यांना ताजे शिजवलेले जेवण पोहोचवते.