Anand Mahindra Impressed by Street Vendors Bartending Skills : तुमच्यापैकी अनेकांना कॉकटेलबद्दल माहिती असेल किंवा तुम्ही ते प्यायलाही असाल. ड्रिंकचा हा असा प्रकार आहे; जो विविध प्रकारचे ड्रिंक्स आणि फळांचा रस मिसळून बनवला जातो. जगात असे बरेच आहेत की, ज्यांना कॉकलेट पिणे आवडते आणि दुसरीकडे काहींना ते अजिबात आवडत नाही. तुम्ही कधी फॅमिली रेस्टॉरंट अॅण्ड बारमध्ये गेला असाल किंवा अनेकदा चित्रपटांमध्ये पाहिले असेल, तर बार टेंडर्स अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने कॉकटेल बनवताना दिसतात; जे पाहून लोकही आश्चर्यचकित होतात. त्यासाठी बार टेंडर्स खूप प्रॅक्टिस करतात. पण, रस्त्यावरील एका सर्वसामान्य ज्यूसविक्रेत्याची कॉकटेल बनवण्याची अनोखी पद्धत तुम्ही कदाचित कधी पाहिली नसेल? त्यामुळे ती पाहण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच. या व्हिडीओत एक ज्यूसविक्रेता कॉकटेल बनवण्यासाठी अशी एक भन्नाट टेक्निक वापरतोय; जी पाहून तुम्हीही त्याचे फॅन व्हाल. ज्या पद्धतीने तो कॉकटेलचा ग्लास हवेत उडवतोय, टेबलावर आपटतो ते पाहताना तुम्हालाही मजा येईल. दरम्यान, देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रासुद्धा व्हिडीओतील या विक्रेत्याचे जबरा फॅन झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये एका ज्यूसविक्रेत्याने कॉकटेल बनवण्यासाठी एक अप्रतिम पद्धत वापरली आहे. त्याची ही पद्धत पाहून आनंद महिंद्राही त्याचे चाहते झाले आहेत. कॉकटेल बनवताना त्या व्यक्तीने काय अप्रतिम कलाकारी दाखवली आहे ते तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. तो कॉकटेलने भरलेला ग्लास हवेत फेकतो आणि मग प्रशिक्षित बार टेंडर असल्यासारखा हाताने तो बॅलन्स करतो. आनंद महिंद्रा यांनी सांगितले की, ही व्यक्ती बार टेंडर नाही; परंतु त्याच्यात टॅलेंट भरपूर आहे. हा व्हिडीओ सीन न्यू इयर इव्ह पार्टीदरम्यानचा आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. या व्यक्तीच्या या टॅलेंटने आनंद महिंद्रा यांना टॉम क्रूझच्या ‘कॉकटेल’ चित्रपटाची आठवण करून दिली.

Indian Railway : तिकीट बुकिंग ते ट्रेन ट्रॅकिंग आता एकाच अ‍ॅपवर! मिळणार रेल्वेबाबतची A to Z माहिती, वाचा सविस्तर

खुद्द आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यावर हजारो लोकांनी लाइक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

एका युजरने लिहिलेय, “हे स्किल आणि डेडिकेशन कमालीचे आहे.” तर दुसर्‍या युजरने लिहिले की, हे अप्रतिम आहे. छोट्याशा ठिकाणीही उत्तम कलागुण आणि क्षमता असतात. त्यांना फक्त पोषण आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते. त्याच्या हाताच्या मूव्हमेंट्स एखाद्या कुशल बार टेंडरपेक्षाही खूप चांगल्या आहेत. त्याचे स्किल आणि कंट्रोल पाहण्यासारखे अन् कौतुक करण्यासारखे आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra impressed by street vendors bartending skills cocktail making calls him tom cruise sjr