उद्योगपती आनंद महिंद्रा हे त्यांच्या हटके ट्विट्ससाठी ओळखले जातात. नुकतेच त्यांनी ब्रिटनमध्ये सुरु असणाऱ्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारं एक ट्विट केलं असून हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ब्रिटीश पंतप्रधानांचं सरकारी निवासस्थान असणारं १० डाऊन स्ट्रीट भविष्यामध्ये कसं असेल यासंदर्भातील एक मीम शेअर केलंय.
नक्की पाहा >> बरनॉल, बरनॉलचे ट्रक, ‘नितेश तुम्ही आता कोणत्या पक्षात जाणार?’ अन् बाचाबाची; राहुल गांधींच्या पोस्टवरुन राणे आणि काँग्रेस नेत्यात जुंपली
आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ब्रिटीश पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंब्याच्या पानांचं तोरण आणि दोन्ही बाजूला स्वस्तिक दाखवण्यात आलं आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या खिडक्यांवर शुभ लाभ असं लिहिण्यात आलं असून मध्यभागी गणपती असल्याचं या फोटोत दिसत आहे. हिंदू सणासुदींच्या दिवशी ज्याप्रमाणे घराला सजवलं जातं तशीच सजावट या घराला करण्यात आल्याचं या फोटोमध्ये दाखवण्यात आलं आहे. “हे १० डाऊन स्ट्रीटचं भविष्य आहे का? ब्रिटीश विनोदाला आता देशी विनोदाची जोड मिळाली आहे,” अशी कॅप्शन आनंद महिंद्रांनी या फोटोला दिलीय.
नक्की वाचा >> टाटाच्या गाड्यांबद्दल तुमच्या भावना काय? आनंद महिंद्रांनी दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
नक्की पाहा >> Video : शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर, हल्लेखोराने गोळ्या झाडल्या अन्…
या फोटोला १५ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. ब्रिटनमध्ये ओढवलेल्या राजकीय संकटानंतर पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. कंजरवेटीव्ह पक्षाच्या जवळपास ४१ मंत्र्यांनी बोरिस जॉनसन यांच्यावर अविश्वास दाखवत राजीनामा दिला आहे. जॉनसन यांच्या मंत्रीमंडळातील अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सर्वप्रथम ५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजीनाम्याचे सत्र सुरु झाले. बोरिस जॉनसन यांच्या राजीनाम्यानंतर नव्या व्यक्तीची पंतप्रधानपदी निवड करण्यात येणार आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आनंद महिंद्रांनी ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यावर ब्रिटीश पंतप्रधानांचं कार्यालय कसं असेल याबद्दलची कल्पना या फोटोतून मांडलीय.