भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा त्यांच्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवर खूप सक्रिय असतात आणि वेळोवेळी काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. कधीकधी ते वचन देतात, आज त्यांनी असेच एक वचन पूर्ण केले आहे. त्यामुळे आनंद महिंद्रा यांचे ट्विट पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. मोदींनी याआधी अनेकदा अमेरिकेचा दौरा केला असला तरी हा त्यांचा पहिलाच स्टेट दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी २२ जून रोजी पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊसमध्ये भव्य स्टेट डिनरचे आयोजन केले होते. यावेळी पाहुण्यांच्या यादीत अमेरिकेतील भारतीय डायस्पोरा तसेच देशातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. यामध्ये महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे देखील या गाला डिनरला उपस्थित होते. यावेळी आनंद महिंद्रांनी डीनरचे काही व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले आहेत. यासाठी आनंद मंहिद्रांनी नेटकऱ्यांना वचन दिले होते.
पाहा पोस्ट
पुढील ट्विटमध्ये, महिंद्रांनी ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणं वाजवणाऱ्या बँडचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. याच कारण असं की, निमंत्रीतांना भव्य डिनरमध्ये भारतीय संस्कृतीचा अनुभव मिळावा. तर दुसर्या ट्विटमध्ये, व्हायोलिन वादक जोशुआ बेल यांचा एक व्हिडिओ महिंद्राने शेअर केला आहे आणि त्याचा परफॉर्मन्स ऐकून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल.
व्हाईट हाऊसमधील हे व्हिडीओ शेअर केल्याबद्दल अनेकांनी आनंद महिंद्राचे आभार मानले आहेत.