Anand Mahindra: उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडिया अकाऊंट ट्विटरवर कायम सक्रीय असतात. ट्विटरवरील हटके, जुगाड गाड्या पाहून ते अनेकदा प्रभावित होतात. ते नेहमी व्हायरल व्हिडिओ, मॉटिव्हेशन व्हिडिओ शेअर करत असतात. बिझनेसमॅन आनंद महिंद्रा यांची कंपनी महिंद्रा ऑटो दरवर्षी लाखो गाड्यांची विक्री करते. या कंपनीचा एसयूव्ही सेगमेंट मध्ये टाटा मोटर्स प्रमाणे दबदबा पाहायला मिळतो. आनंद महिंद्रा कंपनीच्या कारवर तितकेच प्रेम करतात. दरम्यान महिंद्रा यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही सेंकदात रेस कारचा होतोय रोबोट!

Letrons BMW Transformer Car तुर्की ऑटोमोटिव्ह कंपनीने BMW 3 सिरीज सेडानवर आधारित ट्रान्सफॉर्मर कार प्रोटोटाइप तयार केला आहे. हा त ट्रान्सफॉर्मर कार प्रोटोटाइप अगदी हॉलिवूड मुव्हीमध्ये दाखवल्यासारखा आहे. एका ठिकाणी थांबलेली कार ही जागेवर उभी राहते अगदी थाटात. जणू काही एखादा रोबोट उभा राहिला आहे. प्रोटोटाइप ही कार तुर्की कंपनी LETRONS द्वारे विकसित केली गेली आहे आणि कंपनीने तिच्या R&D केंद्रात प्रदर्शित केली होती. त्यावेळी अनेकांनी व्हिडीओ काढत सोशल मीडियावर व्हायरल केले.

आनंद महिंद्राही झाले थक्क

BMW 3 सीरीज सेडानवर आधारित या ट्रान्सफॉर्मर कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या कारचा व्हिडिओ शेअर करताना, महिंद्राचे ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान आणि उत्पादन विकासाचे अध्यक्ष ए. वेलुस्वामी यांना टॅग करत त्यांनी लिहिले, “एक वास्तविक जीवनातील ‘ट्रान्सफॉर्मर’ तुर्कीच्या संशोधन आणि विकास कंपनीने विकसित केला आहे आणि त्याचे प्रात्यक्षिक केले आहे, आपणही आमच्या संशोधन आणि विकास केंद्रात त्याचा आनंद घेतला पाहिजे!”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – कुत्र्यानं अटेंड केलं लेक्चर! IIT बॉम्बेमध्ये कुत्र्याची एन्ट्री, Viral video पाहून म्हणाल कमाल आहे राव…

६ वर्षांपूर्वी बनवली होती ट्रान्सफॉर्मर कार

ही नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवी कार नाही तर लेट्रॉन्सने ऑक्टोबर २०१६ मध्चये ही कार दाखवली होती आणि यूट्यूबवर तिचा एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये कार बनवण्याच्या प्रक्रियेशी संबंधित माहिती शेअर करण्यात आली आहे. ही कार आपल्या जागी कशी उभी राहते आणि थोड्याच वेळात ती रोबोटच्या आकारात कशी बदलते हे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. असेच काहीसे हॉलिवूड चित्रपटातही दाखवण्यात आले होते.

मजेशीर गोष्ट म्हणजे ही कार चालवता देखील येते, ही कार कमी वेगाने कशी चालते हे जुन्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. हे अशा प्रकारे डिझाइन केले आहे की, गाडीचा पुढचा भाग डावीकडे आणि उजवीकडे हलू शकतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra lauds turkish companys real life transformer car pitches same idea to his firm watch video srk
Show comments