प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. जगभरात घडणाऱ्या घडामोडिंवर ते रोखठोकपणे प्रतिक्रिया देतात. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर अधिक चांगल्या गोष्टी शेअर करीत असतात. त्यामध्ये अनेक असे व्हिडीओ असतात की, त्यामधून ते लोकांना चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा त्यांच्या व्हिडीओंमधून तरुणांना नवं काही तरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळते. यावेळी देखील त्यांनी अशीच एक प्रेरणा देणारी पोस्ट शेअर केली आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये
या व्हायरल व्हिडीओ चिम्पाझी माणसाकडे मदत मागताना दिसला आहे. फ्रेंच वाईल्डलाइफ फोटोग्राफर जेसी पिएरी यांनी आफ्रिकेतील कॅमेरूनमध्ये हा व्हिडीओ शूट केला आहे. अनरिअल सीन असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.व्हिडीओत पाहू शकता एका पाण्याने भरलेल्या खड्ड्याजवळ एक चिम्पांझी बसला आहे. त्याला खूप तहान लागली आहे. पाणी प्यायचं आहे. त्यासाठी तो एका माणसाची मदत मागतो. हा माणूस म्हणजे फोटोग्राफर जेसीच आहे. चिम्पाझीने बोलवताच जेसी त्याच्या जवळ गेला. चिम्पाझीने त्याला खाली बसायला लावलं. त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि ते पाण्यात बुडवले. त्याच्या हातांच्या ओंजळीत पाणी घेतलं आणि ते तो प्यायला.
आनंद महिंद्रानी दिला मेसेज
जशी त्याची तहान तृप्त झाली तसं तो पाणी प्यायचं थांबला. पण त्याने जेसीचे हात सोडले नाहीत. त्याने ते त्याच पाण्यात धुतले. ज्या हातांनी तो पाणी प्यायला ते हात पाण्याने स्वच्छ करून दिले. हा क्षण पाहिल्यावर डोळ्यात अक्षरशः पाणीच येतं. यातून आनंद महिंद्रा यांनी एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “गेल्या आठवड्यात ही क्लिप जगभर फिरली. आफ्रिकेतील एका चिंपांझीने पिण्याच्या पाण्यासाठी छायाचित्रकारांची मदत मागितली; नंतर हळुवार हात धुवून त्याची परतफेड केली. यातून आपण धडा घेतला पाहिजे, जर तुम्हाला यश मिळवायचे असेल, तर तुमच्या आजुबाजूच्या लोकांना ऑफिसमधील सहकाऱ्यांना मदत करा. त्याबदल्यात तुम्हालाही मदत मिळेल.”
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – नातीनं आजोबांना दिली साखरपुड्याची बातमी, ऐकून आजोबांना अश्रू अनावर; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल भावूक
हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला काय वाटलं, तुमची भावना आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा.