Anand Mahindra Tweet : अचानक कोणत्या दुसऱ्या शहरात किंवा देशात आपल्याला ओळखीची कोणी व्यक्ती दिसली, तर चेहऱ्यावर एक वेगळचे हास्य फुलते. असेच काहीसे भारतातील सर्वांत बडे उद्योगपती मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांच्या बाबतीत घडले आहे. अमेरिकेच्या रस्त्यावर कॅब बुक करताना त्यांना अचानक भारतीय- अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स भेटल्या. यावेळी आपल्या देशातील कोणा तरी नावाजलेल्या व्यक्तीला भेटताना दोघांचाही चेहरा आनंदाने खुलला होता.

भारतातील दोन सर्वांत श्रीमंत लोक स्वत:साठी टॅक्सी बुक करत होते यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. आपल्या देशात तरी अशी कल्पना करणे अवघड आहे; पण परदेशात काहीही होऊ शकते.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नेहमीप्रमाणे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून अमेरिका ट्रिपशी संबंधित माहिती शेअर केली आहे. परंतु यावेळी त्यांची एक पोस्ट जरा जास्तच शेअर झाली आहे. ही तीच पोस्ट आहे; ज्यामध्ये ते मुकेश अंबानी आणि सुनीता विल्यम्स यांच्यासोबत एका फ्रेममध्ये दिसत आहेत.

आनंद महिंद्रा यांनी द वॉशिंग्टन मोमेंटबाबत लिहिलेय की, मुकेश अंबानी, वृंदा कपूर आणि यूएसचे सेक्रेटरी फॉर कॉमर्स यांच्याशी ते बोलत होते यावेळी त्यांची शटल निघून गेली. त्यानंतर त्यांनी उबेर बुक केली. अमेरिकेच्या रस्त्यावर उबेर कॅबसाठी ते थांबले असताना अचानक त्यांना सुनीता विल्यम्स दिसल्या. यावेळी त्या तिघांनी एक छानसा सेल्फी क्लिक केला; जो आता आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटवर शेअर केला आहे. ज्यावर आता युजर्सच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. इतके दिग्गज लोक एकाच सेल्फीमध्ये पाहून काही युजर्सनी हा जगातील सर्वांत महागडा सेल्फी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी पंतप्रधान मोदींसोबत अमेरिकेच्या स्टेट डिनरसाठी वॉशिंग्टनला गेले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी या स्पेशल डिनरचे आयोजन केले होते. या स्पेशल डिनरमध्ये भारतातील अनेक प्रतिनिधी सहभागी झाले होते. अंबानी कुटुंबाव्यतिरिक्त गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि त्यांच्या पत्नी सत्या नडेला, इंदिरा नूयी यादेखील उपस्थित होत्या.

Story img Loader