Anand Mahindra Dance Viral Video: २०२२ ला निरोप देताना अनेकांच्या संमिश्र भावना होत्या. एकार्थी करोनानंतर सर्व काही सुरळीत सुरु होण्यासाठी हेच वर्ष मुहूर्त ठरलं पण दुसरीकडे रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध, तालिबान्यांचे आक्रमण, भारताच्या हातून थोडक्यात निसटलेला विश्वचषक यामुळे २०२२ काहीसा निराशाजनक ठरला. त्यात २०२२ च्या डिसेंबरमध्ये पुन्हा करोनाने चिंता वाढवली. या सगळ्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच जण उत्सुक होते. तुमच्या आमच्या प्रमाणेच उत्साही मूडमध्ये महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा सुद्धा दिसून आले. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर महिंद्रा यांनी आफ्रिकन डान्सचा व्हिडीओ शेअर करत मी सुद्धा हा डान्स करणार असल्याचे म्हंटले आहे.
आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “२०२२ ला निरोप देण्यासाठी मी आज आनंदाने असा नाचणार आहे—युक्रेनमधील युद्ध आणि कोविडची लाट ओसरल्यानंतर मी या वर्षाकडे वळून बघताना आनंदी आहे.. नवीन वर्षात मोठ्या संकटांवर आपण मात करू अशी आशा.” या मजकुरासह महिंद्रा यांनी झौली डान्स परफॉर्मन्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. झौली नृत्य हे मध्य आयव्हरी कोस्टमधील स्थानिक गुरो लोकांचे पारंपारिक नृत्य आहे.
आनंद महिंद्रा असे नाचणार?
हे ही वाचा<< Video: नवरोबांची कंबर मोडून ‘ती’ उड्या मारू लागली; मंडपाऐवजी हॉस्पिटलला पोहोचली वरात, असं घडलं तरी काय?
झौली डान्स काय आहे?
द किड शुड सी दिस (TKSST) च्या माहितीनुसार , आयव्हरी कॉस्टमधील प्रत्येक गुरो गावात त्यांच्या स्वत:च्या स्थानिक झौली नर्तक आहेत, जे अंत्यसंस्कार आणि उत्सवादरम्यान सारखेच सादरीकरण करतात. नृत्याच्या काही सामान्य स्टेप बसवलेल्या असतात. हे नृत्य पवित्र मानले जाते आणि समाजात समृद्धी आणते असे मानले जाते.महिंद्राच्या पोस्टवर कमेंट करताना, अनेकांनी ‘ जर जगातील युद्ध आणि कोविड थांबले तर आम्ही सुद्धा असेच तुमच्यासह नाचू” असे म्हंटले आहे.