Anand Mahindra On ICC T20 World Cup 2024 final: टीम इंडियाने ‘टी-२० वर्ल्ड कप’च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करीत इतिहास रचला. भारतीय संघाने थरारक विजय मिळवीत ११ वर्षांनी आययीसी स्पर्धेत विजेतेपद आणि १७ वर्षांनी टी-२० विश्वचषक जिंकला. वर्ल्ड कपच्या फायनलच्या थरार अगदी शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून ठेवणारा ठरला. टीम इंडियाच्या १७६-७ धावांचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिका संघाला २० षटकांमध्ये १६९-८ धावाच करता आल्या. या विजयानंतर जगभरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही भारतीय संघाचे कौतुक केले आहे. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतर याचे श्रेय त्यांनी एका व्यक्तीला दिले आहे. आणि त्याचीच आता सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे; जी सध्या व्हायरल होतेय.

आनंद महिंद्रा म्हणाले ‘या’ व्यक्तीच्या आशिर्वादामुळेच जिंकलो

उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करीत ते नेहमीच सर्वांनाच प्रेरित करत असतात. अशातच भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी एक खास पोस्ट करीत भारताच्या विजयाचे श्रेय एका व्यक्तीला दिलं आहे. आता तुम्ही म्हणाल की, नक्की कुणाला श्रेय दिलेय? चला पाहू आनंद महिंद्रा यांनी काय ट्वीट केले.

“क्रिकेट असो वा आयुष्य…”

महिंद्रा यांनी संघाचा अधिकृतपणे ट्रॉफी उचलतानाचा एक व्हिडीओ शेअर केला; ज्यामध्ये संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. सोबतच आनंद महिंद्रा यांनी हिंदीमध्ये शिक्षक किंवा ‘गुरू’ यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, “क्रिकेट असो वा आयुष्य गुरूच्या आशीर्वादानंच जीवनात जिंकता येतं. गुरुपौर्णिमेच्या आधीच टीम इंडियाने प्रशिक्षक राहुल द्रविड यांना गुरुदक्षिणा दिली.”

पाहा पोस्ट

हेही वाचा >> Hardik Pandya Video Call: हार्दिक पांड्याला पत्नी नताशाचा व्हिडीओ कॉल? टीम इंडियाच्या विजयानंतर मैदानात नेमकं काय घडलं? पाहा

असा झाला अंतिम सामना

नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने सात विकेट गमावून १७६ धावा केल्या होत्या. त्यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत दक्षिण आफ्रिकेच्या घशात जाणारा विजयाचा घास हिसकावून घेतला. भारताने अंतिम फेरीच्या या सामन्यात सात धावांनी विजय मिळवला. हार्दिक पांड्याने सर्वाधिक तीन बळी घेतले. जसप्रीत बुमराह अर्शदीप सिंग यांनीही चांगली कामगिरी केली. अक्षर पटेलनेही एक विकेट घेतली.