Republic day 2024 : देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून लोकांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देशाच्या संरक्षणासाठी लढताना शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपली खरी ताकद आपले विनम्र सैनिक आहेत; जे देशासाठी आपले प्राण देण्यास तयार असतात, असे म्हणत आनंद्र महिंद्रा यांनी प्रत्येक भारतीयाला एक खास आवाहन केले आहे.

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या देशभक्तीपर गाण्याची एक छोटी ऑडिओ क्लिपही शेअर केली. १९६२ मध्ये भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ हे गाणे बनवण्यात आले होते.

There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
alibag Adv Aswad Patil resigned from post of district secretary of Shekap
अॅड. आस्‍वाद पाटील यांचा अखेर राजीनामा
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Sharad pawar on eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…
aharashtra New CM Devendra Fadnavis Swearing Ceremony Updates
Maharashtra Chief Minister Oath Ceremony : भाजपची छाप, शिवसैनिकांची पाठ लाडक्या बहिणींची उपस्थिती

National Flag on Apparel : राष्ट्रध्वजाच्या प्रिंटचे टी-शर्ट, कुर्ता, साडी परिधान करण्यापूर्वी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा…

आनंद महिंद्रा पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! आम्ही आमच्या शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रांचे संपूर्ण सामर्थ्य दाखवणारी परेड अभिमानाने पाहतो. पण मी आशा व्यक्त करतो की, आपण दिवसातून काही मिनिटे काढून हे अविश्वसनीय गाणे पुन्हा एकदा ऐकले पाहिजे. त्याद्वारे स्वतःला आठवण करून दिली पाहिजे की, आपली खरी ताकद म्हणजे आपले सैनिक आहेत; जे दूर सीमेवर आपल्या प्राणांची आहुती देण्यास तयार असतात. त्यामुळे आपण आपल्या प्रियजनांसह घरी सुरक्षित असतो. जरा आंख में भर लो पानी….

आनंद महिंद्रा यांनी आपल्या चाहत्यांना त्यांच्या दिवसातील काही मिनिटे काढून लता मंगेशकर यांचे हे सुंदर गाणे ऐकत भारतीय जवानांच्या शौर्याचे स्मरण करण्याची विनंती केली आहे. त्यावर चाहत्यांनीही महिंद्रा यांच्या आवाहनाला समर्थन दिले आहे आणि कमेंट्समध्ये त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

एका युजरने लिहिलेय, रणगाडे आणि क्षेपणास्त्रांच्या पलीकडे असलेल्या खऱ्या नायकांची आठवण करू या. हे गाणे त्यांच्या धैर्याची एक शक्तिशाली आठवण आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले, “तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! तुमची भावना खोलवर प्रतिबिंबित होत आहे. आमच्या सैनिकांच्या धैर्याची गाथा जाणून घेणे हे आमच्या देशाच्या खऱ्या सामर्थ्याचे एक सुंदर स्मरण आहे.”

Story img Loader