Anand Mahindra Praises Shahrukh khan Video Viral : बॉलिवूड स्टार किंग खान पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमवला. चाहत्यांना पठाण चित्रपटाचं वेड लागलं असतानाच आता पुन्हा एकदा किंग खान मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी जबरदस्त पसंती दर्शवली आहे. तसंच दुसरीकडे चाहते या चित्रपटाशी संबंधित अनेक घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे जवान चित्रपटाचं पहिलं गाणं ‘जिंदा बंदा’ रिलीज करण्यात आलं आहे.

या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होताच चाहते भन्नाट रिल्स बनवत आहेत. शाहरुखने अप्रतिम डान्स आणि जबरदस्त डायलॉगबाजी करून या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अशातच आता प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही शाहरुख खानवर स्तुतीसुमने उधळली आहेत. महिंद्रा यांनी एक ट्वीट करून शाहरुखच्या खासीयतबाबत महत्वाचा मेसेज दिला आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Shashank Ketkar
‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…”

नक्की वाचा – Optical Illusion: फोटोत ससा दिसतोय का? पण तो ससा नाही, एकदा क्लिक करून नीट पाहा

इथे पाहा शाहरुख खानच्या डान्सचा व्हिडीओ

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्वीटर हॅंडलवरून ‘जिंदा बंदा’ गाण्याचा व्हिडीओ शेअर करत पोस्टमध्ये लिहिलंय, ५७ वर्षांचा आहे हिरो? त्यांचं वाढत्या वयाची प्रक्रिया गुरुत्वाकर्षण एनर्जीला आव्हान देत आहे. ते जास्तीत लोकांच्या १० पटीने अधिक जीवंत आहेत. जिंदा बंदा असावा तर असा…१ ऑगस्टला शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत १.१ मलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर १४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्सने भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला असून शाहरुखला शुभेच्छाही दिल्या आहेत. एटली यांनी जवान चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून गौरी खानने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जवान चित्रपटात शाहरुख खानशिवाय विजय सेतुपती, नयनतारा यांच्यासोबत सान्या मल्होत्रा यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. तसंच दिपिका पादुकोणचं या चित्रपटात स्पेशल अपीयरन्स असणार आहे.

Story img Loader