भारतातील प्रसिद्ध उद्योगपत्ती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांबरोबर ते नेहमी रंजक गोष्टी शेअर करतात. कधी मजेशीर व्हिडीओ शेअर करतात, कधी हटके जुगाड शेअर करतात तर कधी ह्रदयस्पर्शी व्हिडीओ शेअर करतात. सध्या आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या एका हृदयस्पर्शी पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे. व्हायरल पोस्ट आनंद महिंद्रा यांनी २३ फेब्रुवारी रोजी X वर शेअर केली आहे. व्हायरल पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांनी एका चिमुकल्याचे तोंडभरुन कौतुक केले आहे. या चिमुकल्याने असे काय केले आहे ज्यामुळे महिंद्रांनी त्याचे कौतूक केले आहे? चला सविस्तर जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंद महिंद्रा यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये एका आईने तिच्या मुलीबद्दलचा एक रंजक किस्सा सांगितला आहे. त्याचे झाले असे की,”एक्सवर एका वर्षा नावाच्या महिलेने आपल्या लेकीचे कौतूक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. वर्षा यांची मुलगी इयत्ता चौथीमध्ये शिकत असून तिने एका दिव्यांग मुलाची परिक्षा लिहण्यासाठी कशी मदत केली हे सांगितले आहे. लेकीने दिव्यांग मुलाची मदत केल्याबद्दल तिच्या आईला खूप अभिमान वाटत आहे.

हेही वाचा – अनुष्का शर्मा-विराट कोहलीचा मुलगा ‘अकाय’ कसा दिसेल? AI फोटो होतोय व्हायरल

वर्षाने सांगितले की, साधारण दीड महिन्यांपूर्वी वर्षाला एका महिलेचा मेसेज आला ज्यामध्ये ती तिच्या चौथीमध्ये शिकणाऱ्या दिव्यांग मुलीला मदत करणाऱ्या व्यक्ती शोधत आहे. त्यानंतर वर्षा यांनी त्याच्या चौथी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीला मदत करण्यासाठी तयार आहे का याबद्दल विचारले. त्यांनी आपल्या मुलीला असेही सांगितले की, जर तु मदत करण्यासाठी नाही म्हटली तु काही वाईट व्यक्ती होणार नाही किंवा मी दुःखी किंवा निराश होणार नाही, परंतु हे फक्त तुला हवे असेल तरच करा”

परीक्षेचे कॅलेंडर पाहून थोडी चर्चा करून मुलीने मदतीसाठी होकार दिला. “वर्षा यांच्या मुलीने गेल्या आठवड्याच्या शेवटी दिव्यांग मुलीच्या परिक्षेमध्ये एक वाचक आणि लेखिका म्हणून मदत केली आणि नंतर स्वतःच्या शाळेच्या परीक्षेदरम्यान दुसऱ्या लहान मुलीचीही मदत केली.”

हेही वाचा – जिद्द असावी तर अशी! व्हिलचेअर बाईकवरून डिलिव्हरी करतोय हा दिव्यांग व्यक्ती; झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा फोटो व्हायरल

“तिथल्या परीक्षा केंद्रावर, जे विशेष दिव्यांग मुलांसाठी शाळा आहे, तिथे मला लेखक शोधणे किती कठीण आहे हे शिकायला मिळाले. आपण सर्वसमावेशक शिक्षणाबद्दल बोलत असताना, वास्तविकता या स्वप्नापासून दूर आहे,” असेही वर्षा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले.

पोस्टमध्ये वर्षा यांनी पालकांना विनंती केली की,”आपल्या मुलांना एका विशेष लेखक, वाचक किंवा निस्वार्थी मित्र म्हणून मदत करण्यासाठी प्रोत्साहन द्या”

वर्षा यांच्या या छोट्या गोष्टींनी नेटकऱ्यांची मन जिंकले आहे. आपल्या लेकीच्या कामगिरीचा वर्षा यांना किती कौतुक आणि अभिमान वाटत आहे हे दिसून आले. वर्षां यांनी या किस्सा सांगितल्याबद्दल आनंद महिंद्रा यांनी त्यांचे आभार मानले. ही पोस्ट शेअर करताना महिंद्रा यांनी लिहिले की, “एक छोटीशी, साधी गोष्ट पण, जी या जगाला एक सुंदर ठिकाण बनवते. हा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद, वर्षा.”

४० हजार पेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे. लोक वर्षा यांचे आणि त्यांच्या मुलीच्या प्रयत्नांचे कौतूक करत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra proud of class 4 student who helped specially abled child see post snk
Show comments