एखाद्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे कोट्यावधीचं नुकसान झालं तर त्या कंपनीच्या मालकाचा संतापाने तिळपापड होणं सहाजिक आहे. त्यातच कामाच्या पहिल्या दिवशी तब्बल ७ कोटी ४७ लाखांचं नुकसान केलं असेल तर विचारायलाच नको. रशियामध्ये खरोखरच असा एक प्रकार घडलाय. मात्र या साऱ्या प्रकारावर महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रांनी एक भन्नाट उपाय सुचवलाय. नेहमीच आपल्या हटके पोस्ट आणि सोशल मिडीयावरील वावर यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महिंद्रांनी सुचवलेल्या या पर्यायावरुन दोन गट पडले असून अनेकांना हा पर्याय योग्य वाटलाय तर काहींनी याने काय होणार अशी भूमिका घेतलीय.
घडलंय काय?
पश्चिम-मध्य रशियामधील स्वेर्डलोव्हस्क ओब्लास्ट प्रांतामधील येल्टसीन सेंटरमध्ये एका सुरक्षारक्षकानेच कोट्यावधी रुपये किंमत असणारं चित्र खराब केलंय. या सर्व प्रकरणामध्ये खराब झालेल्या कलाकृतीची किंमत १ मिलीयन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनामध्ये ७ कोटी ४७ लाख रुपये इतकी आहे. कामावर रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या सुरक्षारक्षकाने हा उद्योग केल्याची माहिती समोर आलीय.
कुठे घडला हा प्रकार?
पश्चिम-मध्य रशियामधील स्वेर्डलोव्हस्क ओब्लास्ट प्रांतामधील येल्टसीन सेंटरमध्ये हा सारा प्रकार घडलाय. या सुरक्षारक्षकाने खराब केलेल्या कलाकृतीचं नाव ‘थ्री फिंगर्स’ असं आहे. ही कलाकृती १९३२ ते १९३४ या कालावधीमधील आहे. अॅना लेपोरस्काया यांच्या शोमधील ट्रेटयाकोव्ह गॅलरीमधील हे चित्र आहे. या चित्रामधील तीन व्यक्तींच्या चेहऱ्यांपैकी दोन चेहऱ्यांवर सुरक्षारक्षकाने बॉल पेनने डोळे काढल्याचा दावा करण्यात आल्याचं मेट्रो या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात करण्यात आलाय. डिसेंबर महिन्यामध्ये सात तारखेला आयोजित करण्यात आलेल्या ‘द वर्ल्ड अॅज नॉन-ऑब्जेक्टिव्हिटी, द बर्थ ऑफ अ न्यू आर्ट’ या प्रदर्शनात हे चित्र ठेवण्यात आलं होतं. याच ठिकाणी हा सारा धक्कादायक प्रकार घडलाय.
तो सुरक्षारक्षक कोण?
खासगी सुरक्षा पुरवणाऱ्या कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या या सुरक्षारक्षकाच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नसला तरी त्याचं वय ६० वर्ष असल्याची माहिती समोर आलीय. या व्यक्तीला कामावरुन काढून टाकण्यात आलंय.
पोलिसांनी सुरु केला तपास
या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास सुरु केला असून कालकृती खराब करण्याच्या दाव्याअंतर्गत तपास सुरु आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्याला ३९ हजार ९०० रुपये दंड आणि एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या कलाकृतीला झालेलं नुकसान हे २ लाख ४९ हजार ५०० रुपयांचं असल्याचं सांगण्यात येत आहे.
आनंद महिंद्रा काय म्हणतायत?
मेट्रो या वृत्तपत्राने केलेल्या ट्विटला कोट करुन आनंद महिंद्रांनी या कलाकृतीचं काय करता येईल याबद्दलचा एक सल्ला दिलाय. “चिंता कशाला करायची? हे नवीन ‘क्रिएशन’ एनएफटीमध्ये कनव्हर्ट करा,” असं ट्विट आनंद महिंद्रांनी केलंय. यावरुन काहींनी महिंद्रांमधील उद्योजकाचं कौतुक केलंय तर काहींनी मूळ कलाकृतीला फटका बसल्याचा मुद्दा उपस्थित केलाय.
एनएफटी म्हणजे काय?
एनएफटी म्हणजेच नॉन फंजिबल टोकन्स हा सध्या डिजिटल चलनाचा एक प्रकार असून यामध्ये कलाकृतींना डिजिटल फॉरमॅटमध्ये कनव्हर्ट करुन त्याचा वापर चलनाप्रमाणे केला जातो. सध्या क्रिप्टो करन्सीप्रमाणे या एनएफटीलाही चांगली मागणी असल्याने आनंद महिंद्रांनी ही खरीखुरी कलाकृती आता एनएफटीच्या माध्यमातून नवीन क्रिएशन म्हणून विकण्याचा सल्ला दिलाय.
चित्राचं काय होणार?
या चित्राची नेमकी किंमत ठाऊक नसली तर अल्फा नावाच्या विमा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या चित्राचा विमा ७ कोटी ४७ लाखांचा आहे. आता ही कंपनीच या चित्राची डागडुजी करण्याचा खर्च करणार आहे. या चित्राला पूर्वप्रमाणे वैभव प्राप्त करुन देण्यासाठी त