Anand Mahindra Recalls His School Camping Days : कुटुंबानंतर शाळा हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठं विश्व असतं. अनेक चांगल्या गोष्टींची शिकवण ही शाळेतून मिळत असते. पण शाळेचे ते दिवस एकदा आयुष्यातून गेले की पुन्हा येत नाहीत. शाळेतील पहिला दिवस, मित्र-मैत्रिणींसोबत मिळून खाल्लेला डब्बा, मैदानावरचे खेळ, परीक्षेत केलेली कॉपी, तास सुरु असताना चोरी खालेला खाऊ आणि गप्पा , सरांची बोलणी, मार अशा अनेक गोष्टी सरकन डोळ्यासमोर येतात. यामुळे शाळेचे दिवस हे खरचं खूप भारी असतात. यात शाळेची पिनकिन कधीही न विसरता येणारी आठवण असते. पिकनिकदरम्यान मित्र-मैत्रिणींसोबतचे एक चांगले बाँड तयार होते, यामुळे शाळा सोडल्यानंतरही पिकनिकदरम्यानच्या अनेक आठवणी आयुष्यभर आठवत राहतात. यात शाळेतील जुने मित्र- मैत्रिणी भेटल्या तर या आठवणींची एक मैफिल रंगते. अशाच शाळेतील एका आठवणींच्या मैफिलीत उद्योगपती आनंद महिंद्रा चांगलेच रमले आहेत. आनंद महिंद्रा यांनी एका कॅम्पिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याने त्यांना शाळेतील पिकनिकच्या दिवसांची आठवण करुन दिली आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एका रेडीमेड प्लास्टिकच्या टेंटमध्ये एक व्यक्ती हवा भरतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा अनोखा टेंट हुबेहुब घरासारखा दिसत आहे ज्याला बाहेरील दृश्य पाहण्यासाठी खिडक्या देखील आहे. तुम्ही जर शाळेत असताना कधी ट्रेकिंगला गेला असाल तर तुम्हाला कदाचित अशा टेंटमध्ये राहण्याचा अनुभव घेता आला असेल, तसेच टेंट ठोकतानाही किती मेहनत घ्यावी लागते हेही समजले असेल.
पण उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओतून, सहज बांधता येणारा टेंट शाळेतील पिकनिकदरम्यान कसा तुमचा वेळ वाचवणारा ठरु शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, हुशार! आमच्या शाळेच्या कॅम्पिंग ट्रिपमध्ये (उटीमध्ये) आम्ही केलेल्या सर्व प्रयत्नांना हे निश्चितपणे मागे टाकते. मी विशेषतः मान्सून कॅम्पिंग ट्रिपमध्ये या टेंटवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांच्या आवाजाचा आनंद घेईन. ( पण वादळादरम्यान नक्कीच नाही! ) #Friday Feeling.”
टॅटूमुळे महिलेचे करियर खराब; आता आली टॉयलेट साफ करण्याची वेळ; पाहा व्हायरल Photo
आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ आत्तापर्यंत ५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच त्यावर खूप वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. काहींना या टेंटची आयडीया फार आवडली आहे. तर काहींना महिंद्राच्या कॅम्पिंग साहसांबद्दल अधिक जाणून घेण्यात रस आहे. यात एकाने लॉयल एडव्हाचर्स कस्टमर्सना महिंद्रा थारसोबत देण्यासाठी चांगले गिफ्ट असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी आपल्या कॅम्पिंगदरम्यान टेंटमध्ये राहण्याचे अनुभव शेअर केला आहे.