चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ते एका मुलाला लिफ्ट देण्यासाठी ऑफर करतात, मात्र तो नकार देतो. रात्री बारा वाजताच्या सुमारास नोएडा रस्त्यावर एक मुलगा त्यांना पाठीवर बॅग घेऊन धावत सुटल्याचं दिसतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कच्चा बादाम’नंतर ‘कच्चा अमरुद’ची क्रेझ; पेरूवाल्या काकांचं हे Viral गाणं ऐकलंत का?

काहीतरी अडचण असेल म्हणून विनोद कापरी त्याला लिफ्ट ऑफर करतात. तो मुलगा लिफ्ट नाकारतो म्हणून ते त्याला सारखी विनवणी करतात. पण हा मुलगा आपल्या धावत जाण्यावरच ठाम असतो. गाडीत बसायला तो नकारच देत राहतो. गाडीत बसायला नकार देणाऱ्या या मुलाशी तसाच पुढे संवाद सुरु राहतो. या व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओवर उद्योगक आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रात्रीच्या बारा वाजता पाठीवर बॅग घेऊन रस्त्यावरून धावतोय, लिफ्टची ऑफरही नाकारतोय? कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल!

“हे खरंच प्रेरणादायी आहे. पण माझे Monday Motivation काय आहे हे तुम्हाला माहितीये का?, तो इतका स्वावलंबी आहे आणि लिफ्टची ऑफर नाकारतोय ही वस्तुस्थिती. त्याला मदतीची गरज नाही. तो आत्मनिर्भर आहे!,” असं आनंद महिंद्रा यांनी या मुलाचा व्हिडीओ रिट्वीट करत म्हटलंय.

दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करताना आपल्या ट्वीटमध्ये विनोद कापरी म्हणतात, “हे खरं सोनं आहे. नोएडाच्या रस्त्यावर काल रात्री बारा वाजता मला हा मुलगा खांद्यावर बॅग घेऊन वेगाने पळताना दिसला. मी विचार केला की काही समस्या असेल, आपण त्याला लिफ्ट देऊ. पण या मुलाने वारंवार लिफ्ट घ्यायला नकार दिला. कारण ऐकलंत तर या पोराच्या प्रेमात पडाल”.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra rection on the viral video of a boy running midnight with bag in noida hrc