Anand mahindra Viral Post : असे म्हणतात ना कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते. गाड्यांच्याही बाबतीत तेच आहे. प्रत्येक कारमध्ये जशा चांगल्या गोष्टी, फीचर्स असतात, तशाच काही उणीवादेखील असतात. त्यामुळे प्रत्येक कारबाबत अनेकांची वेगवेगळी मतं, अनुभव असू शकतात. काहींना एखादी कार, त्यातील फीचर्स फार आवडतात; पण काहींना तीच कार निकृष्ट दर्जाची वाटू शकते. सहसा कार कंपन्या किंवा त्यांचे पदाधिकारी सोशल मीडियावर या गोष्टींवर भाष्य करत नाहीत. पण, आनंद महिंद्रा या बाबतीत वेगळे आहेत. अलीकडेच एका युजरने आनंद महिंद्रांच्या कारला कचरा असे संबोधले. यावर आनंद महिंद्रा संतापले आणि त्यांनी युजरला सडेतोड उत्तर दिले. त्यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आनंद महिंद्रा यांनी सांगितले की, “मी हे यापूर्वीही ऐकले आहे, परंतु महिंद्रा कंपनी अजूनही बाजारात आहे.”

मृतदेह दफनाच्या वेळची घटना पाहून अंगावर येईल काटा; स्मशानभूमीतील धडकी भरवणारा VIDEO

युजरने महिंद्रांच्या कारवर केली टीका

युजरने महिंद्रा कारवर टीका करत लिहिले की, “तुमच्या गाड्या जपानी किंवा अमेरिकन गाड्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत. इंपोर्ट सब्स्टिट्यूशन पॉलिसीज असेपर्यंत त्याचा आनंद घ्या. शुल्क कमी होताच महिंद्रा गायब होईल, कचरा गाड्या. यावर आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, तुमच्या शंकेबद्दल धन्यवाद, यामुळे आम्हाला अधिक प्रोत्साहन मिळते.”

यावर आनंद महिंद्रा यांनी युजरला सडेतोड उत्तर दिले आहे. आनंद महिंद्रा म्हणाले की, “जेव्हा मी १९९१ मध्ये कंपनीत रुजू झालो तेव्हा मला नेमके हेच सांगितले गेले होते. जागतिक सल्लागारांनी आम्हाला उद्योगातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. जेव्हा टोयोटा आणि इतर जागतिक दिग्गजांनी भारताच्या यूव्ही क्षेत्रात प्रवेश केला, तेव्हाही आम्हाला तेच सांगण्यात आले होते. प्रत्येक दिवस हा जगण्याची लढाई आहे, ज्याचा आम्ही आनंद घेतो. आम्हाला आशा आहे की, पुढील १०० वर्षांपर्यंत अस्तित्वासाठी लढत राहू.”

Story img Loader