भारतातील सर्वांत यशस्वी आणि प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळख असलेले आनंद महिंद्रा आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. बऱ्याच व्हिडीओच्या माध्यमातून ते सामान्य लोकांचे कौतुक करताना किंवा एखाद्या गोष्टीतील सकारात्मकता दाखवताना दिसतात. सध्या त्यांनीआपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेला व्हिडीओही याचेच एक उदाहरण आहे.
आनंद महिंद्रा अतिशय व्यस्त असतात. असे असूनही ते वेळात वेळ काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत काही चांगल्या गोष्टी पोहचवण्याच्या प्रयत्नात असतात. ते आपल्या प्रत्येक पोस्टमधून काही तरी शिकवण देत असतात. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्येही त्यांनी अशीच एक शिकवण दिली आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी एका चिमुकल्याचे कौतुक केले आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हा लहान मुलगा एका विमानामध्ये जात आहे. यावेळी तो विमानातील इतर प्रवाशांना अभिवादन करत आहे. तो आपल्या जागेपर्यंत पोहचेपर्यंत भेटणाऱ्या प्रत्येक सहप्रवाशाला अभिवादन करत पुढे जात आहे. प्रवासीही त्याला अत्यंत नम्रपणे अभिवादन करत आहेत.
Viral Video: बाईकवर स्टाईलमध्ये करत होता स्टंट, पोलिसांनी अशी अद्दल घडवली की चारचौघात…
आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करत यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना एक सुंदर संदेश पाठवला आणि लिहिले की, “जग अधिक संघर्षग्रस्त होत आहे. जागतिक अराजकतेमुळे केवळ संकटे वाढतात. परंतु जग कसे असावे, हे मुलं आपल्याला दाखवून देतात. अँटोनियो गुटेरेस यांनी या मुलाला शांतता आणि सद्भावनेसाठी संयुक्त राष्ट्रांचे राजदूत बनवावे.”
या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास अडीच लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच नेटकऱ्यांना हा व्हिडीओ अतिशय आवडला आहे. लोकं या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘एकेकाळी प्रत्येकजण लहान होता, मोठे झाल्यावर फक्त एकच खंत आहे की आपल्यापैकी बहुतेकजण जगायला आणि प्रेम पसरवायला विसरतात.’