भारतातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा(Anand Mahindra) हे त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते दररोज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून खूप पोस्ट करताना दिसतात. कधी देशातील गंभीर समस्या आपल्या माध्यमातून मांडतात तर कधी एखादा व्हिडीओ शेअर करत त्याची गोष्ट सांगताना दिसतात. आताही त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एका गर्द झाडीतील रस्त्याचा व्हिडीओ शेअर करत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना विशेष विनंती केली आहे. हे ट्विट केल्यानंतरच ते सोशल मीडियावर झपाटयाने व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये महिंद्रा ग्रुपच्या अध्यक्षांनी नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांना नव्याने तयार करण्यात आलेल्या ग्रामीण रस्त्यांवर झाडे लावण्यास सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओमध्ये गर्द झाडांनी वेढलेला रस्ता दिसत आहे

खरं तर, २७ ऑगस्टला, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ रीट्विट केला आहे. ज्यात दोन्ही बाजूंनी झाडांनी वेढलेल्या एका सुंदर रस्त्याचा व्हिडीओ दाखवण्यात आला आहे. ही क्लिप शेअर करत त्यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना अशीच ग्रामीण रस्त्यावर झाडे लावण्याची विनंती केली आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोन्ही बाजूला झाडांनी वेढलेल्या एका सुंदर रस्त्याचं दृश्य पाहायला मिळत आहे. खरं तर, दुरून तो रस्ता खऱ्याखुऱ्या भोगद्यासारख्या बोगद्यासारखा दिसत आहे. त्यांनी याला ‘ट्रुनेल’ असे नाव दिले जे झाड आणि बोगदा या शब्दाने बनलेले आहे.

( हे ही वाचा: Viral Video: झोमॅटो डिलिव्हरी बॉयला महिलेने केली चप्पलेने मारहाण; व्हिडीओ झाला व्हायरल)

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेला व्हिडीओ येथे पाहा

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय की, “मला बोगदे खूप आवडतात, पण मला अशा ‘ट्रुनेल’ मधून जायला आवडेल..नितीन गडकरीजी, तुम्ही बांधत असलेल्या नवीन ग्रामीण रस्त्यांवर असे काही बोगदे बसवण्याची योजना आखू शकता का?

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर जवळपास २ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. त्याचबरोबर ही पोस्ट अजूनही सातत्याने शेअर केली जात आहे. अनेकांनी यावर आपली वेगवेगळी मतं देखील कंमेंटद्वारे मांडली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra requested union minister nitin gadkari build such road said i would prefer pass through trunnel gps
Show comments