अडथळे हा जीवनाचा एक भाग आहे आणि जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला त्यांचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करताना कोणत्या ना कोणत्या अडथळ्यांनाचा किंवा अडचणीचा सामना करावा लागतो. आनंद महिंद्रांनी त्यांच्या फॉलोअर्सला कठीण काळात प्रेरित होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एका लहान मुलाचा इनडोअर रॉक भिंतीवर चढतानाचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे.
महिंद्रांची पोस्ट
“हा व्हिडीओ काही वर्षांपूर्वीचा आहे, पण तो कधीही जुना होईल असे मला वाटत नाही. मला तो वेळोवेळी टाकायला आवडतो, विशेषत: जेव्हा काही वैयक्तिक किंवा व्यावसायिक उद्दिष्ट भयावह किंवा अशक्य वाटत असेल! माझी सर्व भीती त्वरित नाहीशी झाली,” भिंतीवर चढताना लहान मुलाचा व्हिडीओ पोस्ट करताना महिंद्रा यांनी ट्विट केले.
( हे ही वाचा: करीना कपूरच्या दुपट्टा मेरा गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल! )
नेटीझन्सची प्रतिक्रिया
( हे ही वाचा: Photos: “मी फक्त चकना खाल्ला, दारूच्या…” धोनी, रवी शास्त्री आणि हार्दिकच्या फोटोवर भन्नाट मिम्सचा व्हायरल! )
क्लिपच्या सुरुवातीला मूल स्थिर राहण्यासाठी धडपडत असताना, शेवटी मात्र तो शेवटी वरती पोहोचतो. या क्लिपला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेकांना त्याच्यासोबत शेअर केलेल्या मेसेजमधून प्रेरणा मिळाली आहे. जेव्हा तुम्हाला अपयशाची भीती नसते तेव्हा तुम्ही सर्वोत्तम साध्य करता !! भीती फक्त आपल्या मनात असते, अन्यथा, काहीही अशक्य नाही,” पोस्टवरील अनेक कमेंट्सपैकी एक कमेंट.