उद्योगपति आनंद महिंद्रा (Anand Mahindra) आपल्या सोशल मीडिया पोस्टने नेहमी सर्वांना आश्चर्यचकित करतात. महिंद्रा ग्रुपचे चेअरमनचे ट्विटर हँडल दिले आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमनचे ट्विटर हँडलवर रंजक, प्रेरणादायी आणि मजेशीर ट्विटर पाहायला मिळतात, जे नेहमी सोशल मीडिया यूजर्सची उत्सुकता देखील वाढवतात. ती विशेष स्वरुपामध्ये सर्व भारतीय गोष्टींचे प्रशंसक आहेत आणि नेहमी देशी जुगाडसाठी आपले प्रेम आणि समर्थन व्यक्त करतात. भारतात उन्हाळ्याच्या काळ पाहता महिंद्रा समूहाचे अध्यक्षांनी एक माठ( पारंपारिक पद्धतीने पाणी थंड करण्यासाठी वापरले जाणारे मातीचे भांडे) आणि एक फ्रिज यांच्यामध्ये तुलना केली आहे. त्यांना ही पोस्ट शेअर करून एक ऑनलाईन वाद सुरू केला आहे.
आंनद महिद्रांनी माठ आणि फ्रिजची केली तुलना
पोस्ट शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, खरे सांगायचे तर हा डिझाईन आणि सौंदर्याच्या बाबतीत माठ अधिक चांगला आहे. पृथ्वीसाठी चिंतित असलेल्या जगात हा सकारात्मकता वाढवत आहे, साधा पाण्याचा माठ हा एक प्रीमियम जीवनशैलीचा साधन होऊ शकतो. रेफ्रिजरेटरच्या तुलनेत माठ, मातीचे पाण्याचे देणारा स्वस्त, टिकाऊ आणि सहज हातातून नेता येण्याजोगा असल्याचे त्यांनी सांगितले. तर, 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेले फ्रीज केवळ सात ते 15 वर्षे टिकतात, त्यांच्या देखभालीकडे लक्ष द्यावे लागते, विजेचा वापर करतात आणि ते सहज हातातून नेता येण्याजोगे नसतात. गायक अरिजित सिंगनेही ‘सुरही’ (माठ) बद्दल गाणे कसे गायले आहे, परंतु फ्रीजबद्दल नाही हे देखील पोस्टमध्ये नमूद केले आहे.
आनंद महिंद्राच्या ट्विटमुळे इंटरनेट यूजर्स दोन गटात विभागले
आनंद महिंद्राच्या या ट्विटने इंटरनेट यूजर्सला दोन गटात विभाजीत केले आहे. काही लोक आनंद महिंद्रा यांच्या मताशी सहमत आहे तर काहींनी ते अव्यवाहारिक असल्याचे सांगितले.
यासाठी एका व्यक्तीने लिहिले आहे, ”माठ फक्त पाणी जमा करण्यासाठी उपयोगी आहे. रेफ्रिजरेटर अनेक कार्ये आहेत. ज्यांच्याकडे फ्रीज आहे त्यांच्या कडे माठही आहे कारण ते पाण्याची चव वाढवते आणि उन्हाळ्यात पाणी त्यात थंडही होते. आपण दोन्हींची तुलना करू शकत नाही सर.”
टिका करणाऱ्यांना आनंद महिंद्राने दिले प्रत्यूत्तर
दुसर्याने कमेंट केली, ”यावर विश्वास ठेवणे अवघड आहे की आपण अशा गोष्टी इतक्या गांभीर्याने कसे सांगू शकता.”
त्याला उत्तर देतान आनंद महिंद्रा दिला आहे की, हा स्पष्ट स्वरुपात एक हलकी फुलकी तुलना केली होती त्याला घाबरू नका. शक्लिशाली फ्रिज नाहीसा होण्याचा कोणताही धोका नाही.
आनंद महिंद्राच्या मतावर काहींनी दर्शवली सहमती
पण आणखी एका यूजरने आनंद्र महिंद्राच्या मतावर सहमती दर्शवित, मागील १६ वर्षांपासून माठ वापरत आहे. नैसर्गितरितीने पाणी थंड करते, पाण्याची चव वाढवते. खोकला, सर्दी किंवा इतर कोणतीही अॅलर्जी झाली नाही. बऱ्याच काळापूर्वी बर्फाचे सेवन करणे बंद केले.
आनंद महिंद्रांना विचारले तुमच्याकडे आहे का माठ? दिले हे उत्तर
जेव्हा एक यूजरने आनंद महिंद्रांना विचारले की, तुमच्या घरात माठ आहे का? त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, मी मोठा होताना घरात एक माठ होता. पण आमच्याकडे आता माठ नाही हे मान्य करावे लागेल पण मी त्वरित ऑर्डर करणार आहे आणि अमेरिकेत माझ्या मुलांना देखील पाठविणार आहे.