Anand Mahindra Shares Video: आनंद महिंद्रा हे भारतातील मोठे उद्योगपती आहेत. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करीत ते नेहमीच तरुणांना प्रेरित करीत असतात. कधी नवनवीन शोध, तर कधी जुगाडचे व्हिडीओ ते त्यांच्या हॅण्डलवरून व्हायरल करीत असतात. अशातच आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मूल त्याच्या पाळण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत आहे,. आनंद महिंद्रा यांनी हे मूल करीत प्रयत्नाद्वारे लोकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला आहे.
“हा चिमुकला कुणाच्या आधाराशिवाय प्रयत्न करतोय तर तुम्ही का नाही?”
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मूल त्याच्या पाळण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडते आहे. यावेळी हे लहान मूल अनेकदा अपयशी ठरते; पण शेवटी ते अंथरुणातून बाहेर येतेच. त्याबाबत आनंद महिंद्रा म्हणाले की, नीट चालताही न येणारा हा लहान मुलगा कोणत्याही आधाराशिवाय आपल्या बिछान्यातून बाहेर येऊ शकतो; मग तुम्ही लोक तुमच्या समस्यांपासून का दूर पळता? ही पोस्ट शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले… “जर या बाळाला त्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला असेल, तर तुम्हाला येणारे अडथळे टाळण्याचा मार्गही सापडेल.” दरम्यान, हा व्हिडीओ खूप शेअर केला जात आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, लहान मूल त्याच्या पाळण्यातून पलंगावर बाहेर येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतेय. त्याच्या पलंगाच्या शेजारी असलेल्या त्याच्या मित्राच्या बेडवर जाण्यासाठी म्हणून तो हे करीत आहे. यामध्ये तो सर्वतोपरी प्रयत्न करतो आणि शेवटी यशस्वी होतो. खोलीत उपस्थित असलेल्या त्याच्या केअरटेकरने मुलाचा हा व्हिडीओ बनवला होता.
पाहा व्हिडीओ
https://twitter.com/anandmahindra/status/1812724662595363274
हेही वाचा >> समुद्रकिनारी जाताय? एका लाटेत किती ताकद असते पाहाच; १० सेकंदात महिला किनाऱ्यावरुन थेट समुद्रात, थरारक VIDEO व्हायरल
@anandmahindra नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत एक लाख ३६ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे; तर हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. युजर्स व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “अडथळेच माणसाला मजबूत करतात.” तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिलेय, “इच्छाशक्ती असेल, तर सर्व काही शक्य आहे.”