Anand Mahindra’s Father’s Day : बाबा म्हणजे दिवस-रात्र कष्ट करणारं शरीर, भरपूर काळजी करणारं मन, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून लेकरांसाठी झटणाऱ्या त्या प्रत्येक बाबांचा आज दिवस म्हणजे ‘फादर्स डे! ‘ आज अनेक जण बाबांसाठी कविता किंवा खास कॅप्शन लिहून, त्यांच्या नात्यातील गोडवा सांगत त्यांच्याबरोबर खास व्हिडीओ, फोटो शेअर करत आहेत; तर आज आनंद महिंद्रा यांनीसुद्धा त्यांच्या लहानपणीची एक आठवण शेअर केली आहे. आनंद महिंद्रा यांच्या बहिणीला त्यांच्या बाबांच्या कार्यालयात एक खास कागद मिळाला व हा कागद पाहून आनंद महिंद्रांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला.

आनंद महिंद्रा यांनी ‘फादर्स डे’निमित्त एक खास आठवण शेअर केली आहे. आनंद महिंद्रा जेव्हा आठ वर्षाचे होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांचे एक खास चित्र (डूडल) पांढऱ्या कागदावर काढले होते. आनंद महिंद्रा यांचे बाबा त्यांच्या कार्यालयातील खुर्चीवर बसलेले असतात आणि अगदीच गंभीर हावभाव देत असतात. पण, आनंद महिंद्रांनी हे हावभाव दुर्लक्ष करून, त्यांचे प्रेम लक्षात ठेवून, बाबा खुर्चीवर बसलेले आहेत असे वडिलांचे मौल्यवान चित्र (डूडल) तयार केलं आहे. आनंद महिंद्रा यांची बहीण जेव्हा बाबांच्या कार्यालयात गेली, तेव्हा तिच्या नजरेत ही मौल्यवान वस्तू सापडली. आनंद महिंद्रांनी बाबांचे काढलेले खास डूडल तुम्हीसुद्धा बघा…

Mahesh Babu
“तू, मी अन्…”, महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकरसाठी खास पोस्ट; सोनाली बेंद्रे व ट्विंकल खन्नाने केल्या कमेंट्स
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
dhananjay Munde and karuna munde son
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या मुलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ; म्हणाला, “माझे बाबा…”
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Kushal Badrike Post For Shreya Bugde
“तुला भेटल्यावर…”, श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणाला, “स्वर्गसुद्धा नरक वाटेल…”
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Saif Ali Khan
हल्ल्यानंतरचा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबरचा अनसीन फोटो आला समोर
Chhaava
जेव्हा विकी कौशलला पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांच्या पेहरावात पाहिलं तेव्हा…; अभिनेता संतोष जुवेकर म्हणाला, “कोणी गोरागोमटा…”

हेही वाचा…पाण्यात अडकलेल्या श्वानाला वाचवण्यासाठी तारेवरची कसरत; एकमेकांचा धरला हात अन्… VIDEO तून पाहा मानवी साखळीचे बळ

पोस्ट नक्की बघा…

तुम्ही पाहिलं असेल पोस्टमध्ये आनंद महिंद्रांनी लिहिलं की, ‘माझी बहीण अनुजा, माझ्या आई-वडिलांचे पेपर, अल्बम चाळून बहीण राधिका आणि माझ्यापर्यंत आठवणी म्हणून शेअर करत असते. मागील काही वर्षांपासून ती हे छान काम करते आहे. मी आठ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचे हे डूडल मी काढलं होत. अनुजाने जेव्हा बाबांच्या कार्यालयाला भेट दिली, तेव्हा तिला हे डूडल सापडले. मी पोस्टमध्ये शेअर केलेला त्यांच्या डेस्कवरील फोटोत ते अगदीच गंभीर दिसण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, त्यांचा विनोद आणि खेळकरपणा माझ्या नेहमी लक्षात राहील. #FathersDay च्या शुभेच्छा बाबा. तुम्ही कुठेही असाल, खेळकर रहा’, अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट आनंद महिंद्रा यांच्या अधिकृत @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. त्यांनी पोस्टमध्ये बाबांचे काढलेले डूडल आणि त्यांचा कार्यालयातील एक फोटो एडिट करून कॅप्शनसाहित पोस्ट केला आहे. आज ‘पितृदिन’ म्हणजेच ‘फादर्स डे’निमित्त त्यांच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत आणि आपल्या वडिलांवर असलेलं त्यांचं प्रेम काही शब्दात कॅप्शनमध्ये मांडलं आहे. या पोस्टने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेक युजर्सनी ही पोस्ट पाहून आपला आनंद व्यक्त केला आणि आनंद महिंद्रा यांना ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा पाठवल्या आहेत.

Story img Loader