महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. वेगवेगळ्या जुगाडांचे, अनोख्या संशोधनाची दखल घेऊन ते त्यांच्या ट्वीटरवर संबंधितांचे कौतुक करत असतात. तर, कधी कधी त्यांचं वैयक्तिक जीवन, व्यावसायिक धोरणे आणि विविध विषयांविषयी माहिती शेअर करत असतात. आज त्यांनी त्यांच्या आई-वडिलांचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या आई-वडिलांचा १९५० सालचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो मुंबईतील कान्हेरी लेणीतील असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ते ट्वीटमध्ये म्हणाले की, “१९९५० च्या उत्तराधार्त हा फोटो महाराष्ट्रातील कान्हेरी लेणी येथे काढण्यात आला होता. #ParentsDay च्या निमित्ताने हा फोटो शेअर करत आहे.”

नेहमीप्रमाणे आनंद महिंद्रा यांनी ट्विट करताच अनेक नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.इतका महान उद्योगपती आणि चांगला माणूस दिल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो, असं एकाने कमेंट केली आहे.

Story img Loader