Anand Mahindra Shares Mobile Phone Evolution Video : मोबाइल म्हणजे जणू काही आपल्या जीवनातला एक महत्त्वाचा भाग झाला आहे. सकाळी उठल्यावर पहिला मोबाइल हातात घेऊन, अलार्म बंद केल्यावर दिवसाची सुरुवात ते अगदी मोबाइलमध्ये अलार्म लावून दिवसाचा शेवट. यादरम्यान अनेक ऑफिस, कॉलेज अगदी शाळेचीसुद्धा कामे या मोबाइलवरून केली जातात; ज्यात आता नवल वाटण्यासारखे काहीच नाही. तर बदलत्या काळानुसार मोबाइलचा आकारसुद्धा वाढला आहे आणि अगदी मोबाइलचा वापरसुद्धा, बरोबर ना… तर आज सोशल मीडियावर याच मोबाइलचा प्रवास सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी दाखवला आहे.

सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी १९९१ ते २०२४ असा मोबाइलचा प्रवास दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अगदी नोकिया, एलजी, ब्लॅकबेरीपासून ते अगदी आयफोनपर्यंत अनेक फोन्सचे प्रकार दाखवण्यात आले आहेत. या जुन्या फोनमधला एखादा तरी फोन तुमच्याकडेसुद्धा पहिला फोन म्हणून नक्कीच घरी आला असेल. तर मोबाइलचा प्रवास आणि आनंद महिंद्रा यांनी लिहिलेले कॅप्शन व्हायरल पोस्टमधून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

पोस्ट नक्की बघा…

https://twitter.com/WallaceBeaufort/status/1889638135849488799

मोबाइलच्या गरजेचे रुपांतर व्यसनात कधी झाले हे आपल्याला कळलेच नाही. लहानांना त्याची सवय होऊ लागलीय आणि तरुण पिढीवर तर त्याचे थेट दुष्पपरिणाम दिसायला लागले आहेत. तर हे पाहता आनंद महिंद्रानी (Anand Mahindra) मोबाइलचा प्रवास सांगत कॅप्शन लिहिले की, ‘मी खूप वेळेपासून मोबाइलच्या या परिवर्तनाच्या प्रत्येक टप्याचा साक्षीदार झालो आहे. पण, मला असं वाटत नाही की, खूप काळासाठी हा मोबाइल आपल्या मेंदूमध्ये इन्स्टॉल राहावा’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

पहिला आपण मोबाइलला आकार दिला…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @anandmahindra यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून विविध कमेंट करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “पहिला आपण मोबाइलला आकार दिला, आता तो मोबाइल आपल्याला आकार देत आहे.” तर दुसरा युजर म्हणतोय की, “आपण तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवतोय की, तंत्रज्ञान आपल्यावर”; आदी अनेक कमेंट्स युजर्सनी केलेल्या दिसत आहेत.

Story img Loader